खेड तालुक्यातील निळीक येथे राहणारा प्रदीप खोचरे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातून त्यांची सतत वादावादी होत असे. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत तिचा काठीने आणि दगडाने ठेचून खून करण्याऱ्या आरोपीला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ये.एस.आवटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रदीप खोचरे असे या आरोपीचे नाव असून हि घटना २०१५ साली तालुक्यातील निळीक या गावी घडली होती. अखेर ७वर्षांनी आरोपीला शिक्षा मिळाली आहे.
१६ जून २०१५ रोजी सकाळी प्रदीप याची पत्नी सुवर्णा ही प्रातःविधीसाठी गेली असता डोक्यात संशयाचे भूत शिरलेला प्रदीप हा तिच्या मागोमाग केला. पत्नी बेसावध असतानाच त्याने तिच्या डोक्यावर काठीने प्रहार करून तिला जखमी केले. जखमी अवस्थेत ती खाली पडली असतात दगडाने तिचे डोके ठेचुन तिचा निर्घृण खून केला.
खेड पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी प्रदीप याला अटक करून त्याच्याविरोधात ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायप्रविष्ट असलेला हा खटला आज खेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधिस ये.एस.आवटे यांच्या समोर सुनावणीस आला असता सरकारी वकील मृणाल जाडकर, यांनी केलेला युक्तिवाद, तपासलेले १७ साक्षीदार, वकील मृणाल जाडकर यांनी मांडलेले परिस्थितीजन्य पुरावे गृहीत धरून न्यायाधीश ये.एस.आवटे यांनी आरोपी प्रदीप खोचरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अखेर सात वर्षांनी सुवर्णा खोचरे हिला न्याय मिळाला आहे.