26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriलोकोपयोगी कार्यात सरकार सहभागी होईल - उपमुख्यमंत्री फडणवीस

लोकोपयोगी कार्यात सरकार सहभागी होईल – उपमुख्यमंत्री फडणवीस

आपण जगायचे व दुसऱ्यालाही जगवायचे ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची विचारधारा आहे.

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्याचा व अनेक उपक्रमांचा फायदा सरकारलाही होतो आहे. त्याचबरोबर त्यांचे समाजोपयोगी कार्य मोठे आहे. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात सहभागी होण्याचा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. सुंदरगडावर आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. या वेळी त्यांच्या हस्ते महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी उपयुक्त असलेल्या आणखी दहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. आता संस्थानकडे या सेवेत एकूण ५२ रुग्णवाहिका कार्यरत झाल्या आहेत. जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देहदानाचे केवळ संकल्प झाले नाही तर आत्तापर्यंत ४५ जणांच्या नातेवाईकांनी पार्थिव त्या त्या ठिकाणी पोहोचवले आहेत. आता महाराजांनी देहदानाला पूरक अशी अवयवदानाची ‘ चळवळ सुरू करावी. त्याचाही अनेक गरजूंना लाभ होईल. ते अवयव संबंधित रुग्णालयापर्यंत वेळेत पोचवावे लागतात. त्यासाठी आम्ही ग्रीन कॉरिडोर बनवून ते वेळेत पोहोचवू. संत समाजाचा विचार करतात. समाजाला दिशा देण्याचे, त्यांच्यात जागरूकता आणण्याचे काम करतात. त्यांच्या आध्यात्मिक बैठकीतून माणसे तयार होतात. ते सामान्यातील असामान्यत्व जागृत करतात. आपण जगायचे व दुसऱ्यालाही जगवायचे ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांची विचारधारा आहे.

त्यांच्या कार्याचा फायदा सरकारला होतो. त्यांच्या लोकोपयोगी कार्यात आम्ही सहभागी होण्याचा प्रयत्न करू. या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, धर्म, संस्कृती, पर्यावरण संरक्षण स्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. अपघातावेळी अनेकदा शासनाच्या रुग्णवाहिकेच्या अगोदर संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते एवढी तत्परता आहे. इथली शिस्त वाखाणण्यासारखी आहे. येथे प. पू. कानिफनाथ महाराजांचे कामही चांगले आहे. प्रारंभी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी प्रास्ताविक केले. दोन्ही मंत्र्यांच्या कार्याचा गौरव केला. रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे कसे सुचले तो अनुभव सांगितला. श्रद्धा बोडेकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी संतपिठावर औसा येथील आमदार अभिमन्यू पवार, उद्योजक किरण सामंत, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राहुल पंडित, बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular