26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeMaharashtraगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला असून, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल साईटवर ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे.

राज्यातील कोरोनासंदर्भातील सर्व निर्बंध २ एप्रिलला असणाऱ्या गुढीपाडव्यापासून मागे घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. त्यामुळे ५० टक्के उपस्थिती,  दुहेरी लसीकरण, मास्कसक्ती  हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण याचा अर्थ लोकांनी बेफिकीरपणे वागावे असा होत नाही. लोकांनी स्वत:साठी काळजी ही घेतलीच पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, अनेक दिवस चर्चेत असलेला मास्कच्या वापराचा विषयावर पण त्यांनी भाष्य केले आहे. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आल्याचं राजेश टोपे यावेळी सांगितले. मास्क अनिवार्य नसला,  तरी ऐच्छित वापर करावा. तसेच, मास्कचा वापर ऐच्छिक केला असला तरी लोकांनी आपली आणि इतरांची काळजी घेण्यासाठी जमेल त्या ठिकाणी मुख्य करून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

त्यामुळे मुंबईतल्या शोभायात्रा, गुढीपाडवा,  बाबासाहेब आंबेडकर जयंती हे दिवस पूर्वीसारखे जोशात आणि  उत्साहात साजरे करू शकू, असं राजेश टोपे म्हणाले. मुख्यमंत्री आणि इतर सर्वांनीच टास्क फोर्स, आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे”, असं देखील त्यांनी नमूद केलं. अमेरिका, इंग्लंड, युरोपमधील देशांनी मास्क मुक्त केले आहे. पण आपल्याकडे आपण ऐच्छिक केलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला असून, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल साईटवर ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे. ज्यांना मास्क वापरायचे आहेत त्यांनी वापरावे,  ज्यांना नाही वापरायचा त्यांनी वापरू नये. याचाच अर्थ मास्क हा ऐच्छिक असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे राज्य आता सर्व तर्हेने अनलॉक झाले आहे. तब्बल ७३६ दिवसांनंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त करण्यात आला आहे. कोणतेही निर्बंध आता राज्यात असणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular