28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriमहामार्ग चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार? खा. नारायण राणे

महामार्ग चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार? खा. नारायण राणे

जवळपास १२ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.

गेल्या दहा वषपिक्षा अधिक काळ रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे रत्नागिरी जिल्ह्यातील रखंडत ठेवलेले काम पूर्ण करून घेण्याचे आव्हान खासदार नारायण राणे यांच्या समोर असणार आहे. या खेरीज आणखी छोटी मोठी आव्हाने तर असणारच आहेत. नारायण राणे रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार झाल्यावर त्यांच्यापासून लोकांच्या अपेक्षाही वाढल्या असल्याचे चित्र आहे. ३१ डिसेंबर २०२४ ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे. ही डेडलाईन तरी पाळली जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. २०१० साली मुंबई गोवा महाम ार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर दरम्यान कामाला सुरुवात झाली. जवळपास १२ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.

मात्र, कोकणवासियांचे हाल संपण्याची चिन्ह नाहीत. डिसेंबर २०२३चा मुहूर्त हुकल्याची प्रशासनाने हायकोर्टात कबुली दिली. वर्ष २०११ ला पूर्ण होणारा प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. गोवा महामार्गावरील अपघाती. मृत्यूंचा आकडा दोन हजार पार गेला आहे. गेल्या १० वर्षांत १ हजार ६८५ अपघात झाले. या अपघातात आतापर्यंत दोन हजार दहा (२०१०) नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनात ही माहिती दिली होती. वर्ष २०२३ अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्ण होण्याची घोषणा सरकारने केली होती. वर्ष संपल्यानंतर सरकार आश्वासन पूर्ण झाले नाही.

आता मुंबई गोवा महाम ार्ग चौपदरीकरणासाठी नवीन डेडलाईन सरकारने दिली आहे. आता, ३१ डिसेंबर २०२४ ही नवीन डेडलाईन सरकारने ठरवली आहे. हायकोर्टात सुनावणी दरम्यान सरकारने ही माहिती दिली. त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचाही प्रवास खड्ड्यातूनच होणार आहे. प्रकल्पाला होणाऱ्या विलंबामुळे वाढणारा खर्च हा जनतेचाच पैसा असल्याची टिप्पणी हायकोर्टाने सुनावणी दरम्यान केली. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी सर्वसामान्य जनतेपासून ते पत्रकार संघटना यांनी रस्त्यावर उतरून शासनाचे आणि प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले, मात्र याचा कोणताच परिणाम झाला नसल्याचेच दिसून येते. आता कोकणचे नेते नारायण

राणे खासदार झाल्यावर त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम राणे यांनी केव्हाच पूर्ण करून घेतले आहे. लांजा आणि राजापूर दरम्यानचे कामही बऱ्यापैकी प्रगतीपथावर आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली पासून लांजा या दरम्यान महामार्गाचे काम अजून ग्रीप घेताना दिसत नाही. चिपळूण बहादूर शेख नाक्यावरील पूल, सोनवी संगम`श्वर नदीवरील पूल बांधण्याचे काम सुरु असले तरी काम केव्हा पूर्ण होईल हे कामाच्या परिस्थितीवरून आता सांगणे कठीण आहे.

या खेरीज निवळी घाट आणि ठिकठिकाणी राखडलेले काम येत्या गणपती सण कालावधी पर्यंत पूर्ण होणार नसल्याने गणेशभक्त आणि प्रवासी जनतेचा यावर्षीचाही प्रवास खडतर असणार आहे. या महामार्गाला अनेक ठिकाणी अद्याप गटारे काढलेली नाहीत शिवाय अनेक ठिकाणी महामार्गाला तडे गेले. असून या प्रकल्पचे भविष्य किती असेल याबद्दल शंका निर्माण झाली आहे. खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांचे महामार्गच्या सुरु असणाऱ्या कामाकडे लक्ष वेधले आहे.

मात्र याचा किती परिणाम होईल हे येत्या दिवसात दिसेल. कारण या पावसाळ्यात सावर्डे वहाळ फाटा, आरवली जवळील पूल व रस्ता खचल्याने रस्त्याच्या दर्जावर आता प्रश्न चिन्ह उभे राहू लागले आहे. मुंबई गोवा महामार्ग हा जनतेचा महत्वकांकशी असा प्रकल्प आहे. हा प्रकल्प केव्हा पूर्ण होईल यांकडे साऱ्या जनतेचे गेले. दहा वर्षे लक्ष लागून आहे. अशात कोट्यावधी रुपये खर्चुन सुद्धा हा प्रकल्प पूर्ण करण्यास शासन आणि प्रशासन अयशस्वी होत असेल तर ही बाब जनतेसाठी चिंतेची आहे. खासदार नारायण राणे यांनी या प्रकल्पतात जातीने लक्ष घालून मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास न्यावा अशी जनतेची मागणी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular