26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeChiplunचौपदरीकरणातील काम तकलादू, ठेकेदार सरकारचे जावई आहेत काय? - आ. भास्कर जाधव

चौपदरीकरणातील काम तकलादू, ठेकेदार सरकारचे जावई आहेत काय? – आ. भास्कर जाधव

परशुराम घाटात जावून त्यांनी संरक्षक भिंतीचीही पहाणी केली.

आ. भास्कर जाधव यांनी नुकतीच महामार्गाची पहाणी केली. परशुराम घाटात जावून त्यांनी संरक्षक भिंतीचीही पहाणी केली. चार दिवसांपूर्वी येथील संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडला होता. तेथेही त्यांनी पहाणी केली. संरक्षक भिंतीच्या कामाबाबत त्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. गेली दोन वर्षे सातत्याने या ठिकाणी संरक्षक भिंत ढासळत आहे. एकच काम पुन्हा पुन्हा केले जात आहे. हे किती दिवस चालणार? आपण संरक्षक भिंतीची पहाणी केली. ही भिंत अधांतरी असल्याचे दिसून आले. काळ्या दगडाचे पिंचींग व्यवस्थित केले गेलेले नाही.

महामार्गातील सर्वच कामे तकलादू होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महामार्ग चौपदरीकरणातील काम अत्यंत खराब दर्जाचे होत आहे. हे केंद्र आणि राज्यातील सरकारच्या प्रतिनिधींना समजत नाही का? अधिकारी पहाणी करत नाहीत का? पहाणी करत असतील तर त्यांना हे काम दिसत नाही का? मग संबंधित ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही? चिपळूणात बहादूरशेख नाका येथे पूल कोसळला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळत आहेत.

संरक्षक भिंतही कोसळली. तरीही एकाही ठेकेदारावर कारवाई केल्याचे वृत्त नाही किंवा त्याला काळ्या यादीत टाकल्याचे ऐकीवात नाही. हे ठेकेदार सरकारचे जावई आहेत काय? असा सवाल आ. भास्कर जाधव यांनी केला. आजवर या महामार्गाने शेकडो बळी घेतले आहेत. अनेक कुटुंबांना निराधार केले आहे. चौपदरीकरणाचे काम प्रलंबित राहिल्याने हे सर्व घडत ओहे. त्यातच कामाला दर्जाही नाही. तरीही राज्य आणि केंद्र सरकार याकडे लक्ष देत नाही. विरोधक सातत्याने ओरड मारत आहेत. तरीही गेंड्याची कातडी असणारे सरकार लक्ष देत नाही ही बाब दुर्देवी असल्याचे आ. भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

दरम्यान मनसे नेते वैभव खेडेकर यांनीही चौपदरीकरणातील कामावर टीका केली आहे. याआधीही आपण कामाच्या दर्जावर शंका उपस्थित करत आंदोलन केले होते. मात्र आपल्याला दीड महिना तुरुंगवास सोसावा लागला. मात्र खराब काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही. कशेडी बोगद्यातून पाणी गळत आहे. मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्र सरकारचा कोकणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. ही बाब दुर्देवी आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांना याबाबतचा अहवाल देवू व पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे..

RELATED ARTICLES

Most Popular