28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

रत्नागिरीमध्ये परिवर्तन घडवायचेच या उद्देशाने माने-महाडिक-बनेंमध्ये बंद दाराआड चर्चा?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून रत्नागिरी-संगमेश्वर...

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...
HomeIndiaकोविड किट मागील रंजक कहाणी

कोविड किट मागील रंजक कहाणी

भारतामध्ये मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड या एकाच कंपनीला या कीटसाठी परवानगी दिली गेली आहे. 

कोरोना काळातील एक दिलासादायक बातमी म्हणजे शासनाने होम बेस्ड रॅपिड टेस्टिंग किटला दिलेली मंजुरी. या किटच्या सहाय्याने आता घरबसल्या देखील स्वत: कोविड-१९ चाचणी करणे शक्य होणार आहे. आयसीएमआरने कोविड-१९ च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटचे प्रकरण मंजुर केल आहे. हे एक रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट असून याचा वापर फक्त कोरोनाची सौम्य लक्षणे ज्यांच्यामध्ये जाणवत आहेत किंवा जे कोरोना संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक आहेत ते या कीटचा वापर करु शकतात. भारतामध्ये मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड या एकाच कंपनीला या कीटसाठी परवानगी दिली गेली आहे.

परंतु, त्या कीट तयार करण्यामागे डोक कोणाच वापरलं गेलं आहे हे जाणून घेऊया. काही वेळा असे होते कि, एखाद्या गोष्टीला खूप प्रसिद्धी मिळते, आर्थिक रित्या सुद्धा खूप फायदा होतो, एखादी गोष्ट देशाच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरते, पण त्यामागे दिवसरात्र मेहनत घेणार कोण आहे हे मात्र कधी कळून येत नाही. पुण्यातील मायलॅब मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील असलेल्या टीमने या किटची निर्मिती केली आहे. या महिलेच विशेष कौतुक वाटत कि, हे किट तयार करण्याची प्रक्रिया सुरु असताना त्या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट म्हणजे तिच्या शरीरात निर्माण होणारा जीव. प्रत्येक स्त्री साठी हा काळ खूप खास असतो, जेवढे स्वत:चे हट्ट पुरवता येतील, व्यवस्थित काळजी घेऊन आराम करता येईल, आहाराबद्दल सतर्कता इ. एक ना अनेक गोष्टी या काळात महिलावर्ग करताना दिसतो. परंतु या रणरागीणीने मात्र आपल्या या अवघड प्रसंगी आयुष्यात येणाऱ्या लहान जीवासकट या नवीन किटला जन्माला घातले. १८ मार्च २०२० रोजी पुण्यातील एनआयव्ही या संस्थेमध्ये या किटची पहिली चाचणी घेण्यात आली. आणि किटची जबाबदारी पूर्णत: पेलून, नव्या जबाबदारीकडे ही महिला वळली. या कीट टेस्टच्या दुसऱ्याच दिवशी १९ मार्च रोजी मीनल यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पुढील पाच दिवसामध्ये म्हणजे २३ मार्च २०२० रोजी त्यांनी अन् त्यांच्या सहकारी टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारने परवानगी दिली.

minal dakhave bhosale

तस पाहायला गेलं तर देशातील अनेक लॅब्ज मागील वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्यापासून वेगवेगळे किट्स बनवण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु, एकही कंपनीला हवे तसे यश प्राप्त झाले नाही. त्यावेळी पुण्याच्याही या लॅबमध्ये वेगाने हे काम सुरु केले होतं. देशातून कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मिनल दाखवे भोसले यांनी आठ महिन्यांच्या गर्भार अवस्थेमध्ये हे चेलेन्ज स्वीकारले. खरंतर अशा वेळी स्वत:ची शक्य तितकी काळजी घेण्यास डॉ सांगतात, तसेच घरातूनही जेवढ जपायला पाहिजे तेवढी जपायला सांगितलं जातं. ९५ टक्के स्त्रिया तर घरीच राहुन आराम करण पसंत करतात. स्वतःचं  कुटुंब, १० सहकाऱ्यांची टीम आणि गर्भात वाढणारा जीव अशा सर्वांच्या सोबतीने मीनल दाखवे भोसले यांनी हे युद्ध साकारले.

हे भारतातलं पहिलं कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासामध्ये त्यांची नोंद झाली. एक किट बनवायला साधारण १२० दिवस लागतात, तिथं हे किट फक्त ४५ दिवसामध्ये बनवण्यात आले. हा सुद्धा एक प्रकारचा रेकॉर्डचं आहे. या किटची किंमत १२०० रुपये इतकी असून, जर परदेशी किट खरेदी करायला गेलो तर त्याचे मूल्य साधारण ४५००-५००० रुपयापर्यंत जाते. फक्त २ तासामध्ये या किटचा रिपोर्ट तुम्हाला कळू शकतो. या एका किटमध्ये तब्बल १०० चाचण्या होऊ शकतात.

मिनल डाखवे-भोसले मायलॅब डिस्कव्हरी, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ यांना जेंव्हा विचारण्यात आलं की तुम्ही या अवस्थेमध्ये एवढ्या सगळ्या गंभीर रिस्क डोळ्यासमोर दिसत असताना देखील हे काम करायचा निर्णय का घेतला ! त्यावर त्यांनी फक्त हसून एवढच सांगितल कि, देशाची सेवा करायची होती, प्रत्येकाने आपापल्या परिने जशी जमेल तशी करावी. मला अशा प्रकारे जमली त्याप्रकारे मी केली.

RELATED ARTICLES

Most Popular