27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeMaharashtraमहिला कोविड सेंटरसाठी विशेष नियम

महिला कोविड सेंटरसाठी विशेष नियम

महिला रुग्णांच्या अधिक सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने कोविड सेंटर्स संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केल्या असून, त्या सूचनाचे तात्काळ पालन  करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

एकीकडे कोरोनाचे संकट, उपचारांमध्ये येणाऱ्या अडचणी, अनेक वैद्यकीय सुविधांचा तुटवडा तर दुसरीकडे एक वेगळ्याच अडचणींचा सामना महिला वर्गाला करावा लगत आहे. देशात जिल्ह्याप्रमाणे, तालुक्याप्रमाणे आवश्यकतेनुसार कोविड सेन्टर्सची स्थापना शासनाने केली आहे. परंतु, काही ठिकाणी कोविड सेंटर्समध्ये महिलांवर होणार्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत आणि ही नक्कीच खूप दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे आता महिला रुग्णांच्या अधिक सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने कोविड सेंटर्स संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केल्या असून, त्या सूचनाचे तात्काळ पालन  करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या नियमावलीमध्ये साधारण १६ मुद्द्यांचा समावेश केला गेला आहे. काय आहेत या SOP जाणून घेऊया थोडक्यात !

  • प्रथम महिलांची उपचार व्यवस्था पाहणारे वेगळे कोविड सेंटर अथवा विभाग असावा.
  • महिलांच्या कोविड वॉर्डमध्ये पॅनिक बटणाची सोय करण्यात यावी, जेणेकरून आपत्कालीन वेळी ते बटण दाबून महिला मदतीसाठी सहाय्य मागू शकतात.
  • महिला वॉर्डमध्ये काम करत असताना पुरुष कर्मचाऱ्यासोबत महिला नर्स असणे अनिवार्य आहे.
  • महिला वॉर्डमध्ये करण्यात येणारी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटला सीसीटीव्ही चालू अवस्थेत असणे अत्यावश्यक आहे. तसंच वॉर्डमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांची नोंद रजिस्ट्ररमध्ये करणे गरजेचे आहे.
  • महिलांच्या वॉर्डमध्ये स्वच्छ टॉयलेटची सुविधा असणे गरजेचे आहे.
  • महिला वॉर्डमध्ये २४ तास पाणी आणि विजेची सोय केली जावी.
  • या सर्व सूचनांसोबतच गर्भवती महिलांसाठी अॅम्बुलन्सची २४ तास सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेसोबत महिला नर्स असणे अनिर्वाय आहे. तसंच कोविड सेंटरमध्ये गर्भवती महिलांसाठी विशेष वॉर्ड राखीव असणे आवश्यक आहे.
  • तसेच जर कोरोनामुळे एखाद्या महिलेचा मृत्यू झाला तर, महिलेचा मृतदेह पिशवीमध्ये गुंडाळताना सुद्धा पुरुष कर्मचाऱ्यां सोबत महिला कर्मचारी असणे अनिर्वाय आहे.

Special rules for the Women's Covid Center

राज्य सरकारने यासारख्या महत्त्वाच्या मार्गदर्शन सूचना जारी केल्या असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या अत्यंत गरजेच्या आहेत. कोरोनाच्या भीतीने एकटा पुरुष अथवा महिला सर्व कुटुंबापासून लांब कोविड सेंटर मध्ये दाखल होतात, त्यातील काही महिलांना अशा प्रकारच्या संकटाना सुद्धा तोंड द्यावे लागते, काही निमुटपणे सहन करतात तर काही त्या विरोधात आवाज उठवतात आणि त्यामुळे अशा घडलेल्या घटनांची माहिती कळते. यापूर्वी देखील अनेक कोविड सेंटर्समध्ये महिलांवर लैगिंक अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे  राज्य सरकारसमोर महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा होता. त्यामध्ये या मार्गाने नक्कीच सुधारणा होईल. अर्थात सर्वच ठिकाणी अशी वागणूक नसते, काही ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे उपचार पद्धती अवलंबून, रूग्णासोबतची वर्तणूक देखील चांगली ठेवल्याने रुग्णाला लवकरात लवकर बरे होण्यास उभारी मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular