27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeSportsभारत आणि पाकिस्तान मालिका रंगण्याची शक्यता

भारत आणि पाकिस्तान मालिका रंगण्याची शक्यता

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सांगितले की, दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी खेळ हाचं एक सर्वोत्तम मार्ग असून त्यामध्ये फक्त कसलेही राजकारण येत कामा नये.

गेल्या आठ वर्षापासून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ऐकमेकांच्या विरोधात क्रिकेट मालिका खेळलेले नाही. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी क्रिकेट मालिका खेळवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. जर या दोन्ही देशांमध्ये क्रीकेट खेळविले गेले तर अंतर्गत संबंध मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. २०१२-१३ मध्ये भारत दौऱ्यात पाकिस्तानने २ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळले होतेत. भारत व पाकिस्तान यांच्यात ८ वर्षांनी द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाक माध्यमांनुसार मिळालेल्या माहिती नुसार, दोन्ही संघां दरम्यान या वर्षी ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाऊ शकते. त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेली नाही. केवळ आयसीसी व एसीसीच्या स्पर्धेदरम्यान भारत पाकिस्तान दोन्ही संघ समोर आलेले. भविष्यातील कोणत्याच नियोजनामध्ये मालिकेसाठी निश्चित स्थान नाही. परंतु, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने म्हटले की, भविष्यात जर मालिका खेल्वायची असेल तर होणाऱ्या चर्चेसाठी ते तयार आहेत. तसेच पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले आहे की, यावेळी मालिका होणार असेल, तर भारतीय संघ पाक दौऱ्यावर येईल कारण मागच्या वेळी पाकिस्तान संघ भारत दौर्यावर आला होता.

पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी दोन संघांमध्ये खेळवली जाणारी ही मालिका किती सावाश्याक्तेची असल्याचे म्हटले होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, आता जगभरामध्ये सर्वच खेळांमध्ये राजकारणाने हस्तक्षेप सुरू केल्याने निदान क्रिकेटला तरी यापासून दूर ठेवता आले पाहिजे. यापूर्वी मिळालेल्या वृत्तानुसार, दोन्ही संघामध्ये तीन सामन्याचे टी-20 मालिका होण्याची शक्यता वर्तवली आहे. आणि खर्च तसे झाले तर आठ वर्षानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा ऐकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी उभे राहतील. 2012 सालामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. त्यामध्ये टी-20 मालिका 1-1 बरोबरीत राहत एकदिवसीय मालिका पाकिस्तान संघाने 2-1 जिंकलेली.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सांगितले की, दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी खेळ हाचं एक सर्वोत्तम मार्ग असून त्यामध्ये फक्त कसलेही राजकारण येत कामा नये. भारतीय संघाचे पाकिस्तानमध्ये आगमन झाल्यावर मोठ्या प्रमाणावर खूशी त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाल्याची म्हटलेले. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीमध्ये यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आतापर्यंत या प्रकरणावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या 30 मार्च रोजी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा होण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान या विषयावर तोडगा निघाला तर संमती दर्शवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपूर्ण जगभरातून प्रेक्षक या दोन देशाच्या दरम्यान होणार्या सामान्यांसाठी कायम प्रतीक्षेत असतात, जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त टीआरपी भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांना मिळतो. मात्र, दोन्ही देशांच्या तणावपूर्ण संबंधांमुळे सातत्य असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून केवळ आयसीसीच्या स्पर्धा वगळता द्विपक्षीय मालिका खेळवल्या गेलेल्या नाहीत. परंतु, तरीसुद्धा पाकिस्तान मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी एकतर्फीच विश्‍वास व्यक्त करून भारतीय संघ पाकिस्तानच्या दौर्यावर खेळण्यासाठी येईल, असे विश्‍वासाने सांगितला आहे. त्याचप्रमाणे आगामी आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येण्यास तयार होईल, अशीही भविष्यवाणी मणी यांनी केली आहे. गेल्या जवळपास 14 वर्षांत या दोन संघात द्विपक्षीय मालिका न झाल्याने, निदान येत्या काळात आशिया स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले असल्याने भारतीय संघ पाकिस्तानात येईल, असे सांगितले जात असले तरीही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप केंद्र सरकारने बीसीसीआयला ग्रीन सिग्नल  दिलेला नाही. तरीही मणी यांच्या  आत्मविश्‍वासाचे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular