26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

ठाकरे गटाला आणखी मोठा हादरा बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडी अपयशी ठरल्यानंतर शिवसेना (उबाठा) गटातील रथीमहारथी आता मजबूत संघटनेच्या शोधात आहे. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे. नुकताच पराभवाचा सामना करावा लागलेले लोकप्रतनिधी भाजपच्या वाटेवर आहेत तर उबाठातील काही प्रमुख पदाधिकारी शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. त्याबाबतच्या गुप्त बैठका नुकत्याच झाल्या. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी मोठा हादरा बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लागलेली गळती काही थांबण्याचा नाव घेईना. शिवसेना उपनेते उदय सामंत आणि किरण सामंत यांनी शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, सदस्य, पदधिकारी यांचे मोठ्या प्रमाणात शिंदे शिवसेनेत प्रवेश करून घेतले; परंतु या सर्व वातावरणाचा विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही, असा दावा ठाकरे शिवसेनेतून करण्यात आला.

त्यात पक्षाकडून निष्ठावंतांना काही किंमत दिली जात नाही, असा संदेश उदय बने या निष्ठावंताला उमेदवारी नाकारल्यानंतर सर्वत्र पोहचवला. बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातच उबाठा सपाटून आपटली. उबाठाच्या या राजकीय अवस्थेमुळे अनेक पदाधिकारी नाराज आणि अस्वस्थ आहे. उदय सामंत यांच्याबरोबर त्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजते. लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा स्तरावर तीन टर्म पूर्ण केलेले आणि आताच्या निवडणुकीत पराभव झालेले लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत. या लोकप्रतिनिधीचीदेखील चाचपणी सुरू आहे. भाजप पक्षाशी त्यांची चर्चा झाली आहे. मोठे पद पदरात पाडून घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. ५ तारखेला होणाऱ्या शपथविधीनंतर या घडामोडींना वेग येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular