26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriनिधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट...

निधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट…

सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा अशा तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील काजिर्डा घाट रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित राहिला आहे. घाटमाथ्यावर जाण्यासाठी अन्य मार्गांना पर्यायी मार्ग असलेला काजिर्डा घाट रस्त्याच्या सव्र्व्हेक्षणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून, घाटरस्त्याच्या निर्मितीसाठी आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सव्र्व्हेक्षणाची निविदा प्रक्रियाही झाली आहे; मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. घाटमाथा परिसर आणि कोकण यांना अणुस्कुरा घाटातून गेलेल्या रस्त्याव्यतिरिक्त काजिर्डा घाटातून जाणारा पर्यायी मार्ग आहे. अणुस्कुरा घाटमार्ग होण्यापूर्वी काजिर्डा घाटातून रस्ता करण्याला प्राधान्य दिले गेले होते. त्या दृष्टीने सत्तरीच्या दशकामध्ये सर्व्हेक्षणही झाले होते; मात्र, काही कारणास्तव काजिर्डा घाटरस्ता मागे पडून अणुस्कुरा घाटरस्ता झाला. त्यानंतर काजिर्डा घाटरस्त्याचे भाग्य उजळलेले नाही. जुलै २०२१ मध्ये कोकणात झालेल्या अतिवृष्टीत आंबाघाटासह अन्य घाटांमध्ये दरडी कोसळून हे घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते.

त्यातून या घाटमार्गे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी असलेला संपर्क आणि दळणवळण ठप्प झाले होते. राजापुरातून जाणारा अणुस्कुरा घाटमार्ग, सातत्याने कोसळणाऱ्या दरडी अन् दगडी, मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आदींमुळे असुरक्षित झाला होता. त्यामुळे कोकण-कोल्हापूरसाठी जोडणारा एखादा भक्कम आणि सुरक्षित घाटमार्ग असावा, असा मुद्दा चर्चेत आला होता. अनेक वर्ष दुर्लक्षित काजिर्डा घाटमार्ग त्यामुळे पुन्हा चर्चेत आला. काजिर्डा घाटमार्ग रस्त्याबाबत चर्चा होऊन या रस्त्याच्या सव्र्व्हेक्षणासाठी अर्थसंकल्पामध्ये सुमारे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर, घाटरस्त्याच्या निर्मितीसाठी आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा मागवून ठेकेदार निश्चित झाला आहे; मात्र दोन्ही निवडणूक झाल्यानंतरही प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले नव्हते.

काजिर्डा घाटमार्गाची वैशिष्ट्ये – काजिर्डा-कोल्हापूर सुमारे ३०-३५ किमी. अंतर वाचणार, घाटमाथ्याशी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हाही जोडला जाणार, सुमारे ५५ ते ६० गावांना कोल्हापूरचा फायदा होणार, घाटमार्गातील पर्यटनाला मिळणार चालना

नियोजित काजिर्डा-कोल्हापूर मार्ग – राजापूर-ओणी-रायपाटण-पाचल-तळवडे-मूर-काजिर्डा-पडसाळी-बाजारभोगाव-कळे-कोल्हापूर. असा नियोजित काडिर्डा-कोल्हापूर मार्ग आहे.

RELATED ARTICLES

Most Popular