23.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedखेडचा गुंता वाढला; व्हिडिओत मोबाईल गेम मधून हत्त्या झाली 'टास्क'चा उल्लेख असल्याचा संशय

खेडचा गुंता वाढला; व्हिडिओत मोबाईल गेम मधून हत्त्या झाली ‘टास्क’चा उल्लेख असल्याचा संशय

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या भोस्ते घाटात एक मृतदेह आढळला होता.

खेड मधील रहस्यमय गुन्ह्यात आणखी नवा ट्विस्ट समोरं आला आहे. स्वप्नात मृतदेह दिसल्याचा जबाब नोंदविणाऱ्या योगेश आर्या याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मृत व्यक्तीच्या संदर्भातील वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट मध्ये अनेक वेळा ‘टास्क’चा उल्लेख असल्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. घडलेली घटना मोबाईल गेम मधून झाली की आणखी काही कारणामुळे? याबाबत पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी योगेश आर्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तसेच सिंधुदुर्गमधून आणखी दोन तरुणांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासासाठी पोलिसांचे एक पथक गोव्यात गेले आहे.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या भोस्ते घाटात एक मृतदेह आढळला होता. योगेश आर्या नावाच्या सावंतवाडीच्या तरुणाच्या स्वप्नात भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं येत होतं. याची फिर्याद योगेश आर्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा तिथे खरंच मृतदेह आढळला. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ज्या योगेश आर्याला भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं होतं त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतः योगेश आर्याची चौकशी केली आहे. तसेच पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी जाऊनही भेट घेतली आहे.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि श्वान पथकानेही ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला तिथली पाहणी केली आहे. एखाद्याला लांबची जागा दाखविणारे स्वप्न पडते. ते स्वप्न तंतोतंत खरे ठरते, हे शक्य आहे का, जंगलात हाती लागलेला तो मृतदेह कोणाचा, आर्या एवढ्या लांब जंगलात गेला कसा, आर्या अगोदरच पोलिसात का गेला नाही? असे ग्रामस्थांना प्रश्न पडत आहेत. भोस्ते घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेरळ येथील ग्रामस्थांनी योगेशपासूनच या प्रकरणाची चौकशी सुरू करावी आणि या मृतदेहाचे गूढ उकलावे, अशी मागणी केली होती.

दरम्यानं योगेश आर्याने. सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. खेडमध्ये त्याने डोंगराळ भाग कसा शोधला ? कोणत्या व्यक्तीकडून माहिती घेतली हा व्हिडिओदेखील त्याने इन्स्टाग्रामवर टाकला आहे. योगेश पिंपळ आर्या (वय ३०, रा. सावंतवाडी) हा उच्चशिक्षित असून तो मूळचा बिहारचा आहे. सावंतवाडी आणि गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने नोकऱ्या केल्या आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यांपासून त्याला ही स्वप्न पडत होती. स्वप्नात खेड रेल्वे स्थानकाचा बोर्ड दिसला. त्यानंतर जंगलातील टॉवर दिसला. त्याने येथे येऊन त्याची खात्री केल्यानंतर आजगांव येथे राहाणारी ही व्यक्ती खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

योगेश आर्या याच्या या व्हिडिओमध्ये अनेक वेळा टास्कचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घडलेली ही घटना मोबाईल गेम मधून झाली की आणखी काही कारणामुळे याबाबतचा पोलीस तपास सुरू झाला आहे. योगेश आर्याच्या इंस्टावरील व्हिडिओमुळे पोलिसांसमोर तपासाची नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. मृत व्यक्ती आणि योगेश यांचा नेमका काय संबंध आहे, हे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. हा मृतदेह कोणाचा, त्या व्यक्तीलाच स्वप्नात कसा गेला यावर पोलिस काम करत आहेत.

आर्या हा गोव्याला नोकरी करत असल्याने तेथे काही माहिती मिळते का, याचा शोध घेण्यासाठी एक पथक गोव्याला पाठविण्यात आले आहे. मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ३ महिन्यापूर्वीचा मृतदेह असल्याचा अंदाज आहे. खेड आणि गोवा पोलीस ठाण्यात बेपत्ता असलेल्यांचीही माहिती पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. पोलीस देखिल या चमत्कारिक प्रकरणामुळे कामाला लागले आहेत. ‘आर्या हा आई- वडिलांबरोबर राहात नाही. परंतु त्याचे वडील येथे आले आहेत. दरम्यानं या प्रकरणी सिंधुदुर्गमधून आणखी दोन तरुणांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular