27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeKhedखेडमध्ये डेंगी सर्वेक्षणाची मोहीम थंडावली

खेडमध्ये डेंगी सर्वेक्षणाची मोहीम थंडावली

डेंगी साथीचे थैमान सुरू असतानाही प्रशासकीय यंत्रणेकडून कुठल्याच उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याचा सूर नागरिकांतून आळवला जात आहे.

शहरात फैलावलेली डेंगीची साथ अजूनही आटोक्यात आलेली नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या डेंगीसदृश्य रुग्णाची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर येत आहे. डेंगी साथीचे थैमान सुरू असतानाही प्रशासकीय यंत्रणेकडून कुठल्याच उपाययोजनांचा अवलंब केला जात नसल्याचा सूर नागरिकांतून आळवला जात असून नागरिकांची धास्ती अजूनही कायम आहे. शहरात आरोग्य कर्मचाऱ्यांची सर्वेक्षणाची मोहीमही आठवड्यापासून थंडावल्याची माहिती पुढे येत आहे. गेल्या महिनाभरापासून डेंगी साथीने डोके वर काढले आहे.

डेंगीसदृश रुग्ण शासनाच्या आपला दवाखान्यात अथवा कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खासगी रुग्णालयांमध्येच उपचार घेणे पसंत करत असल्याचे दिसून येत आहे. खासगी रुग्णालयांमध्येच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असून रक्ताच्या चाचण्या करणाऱ्या रुग्णांचीदेखील संख्या तितकीच आहे. तालुका आरोग्य विभागासह नगर प्रशासनाने डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही डेंगीसदृश रुग्ण आढळतच असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.

शहरात फैलावलेल्या डेंगी साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली होती. याद्वारे कंटेनर सर्वेदेखील करण्यात येत होता; मात्र गेल्या आठवड्यापासून सर्वेक्षणाची मोहीम थंडावली आहे. डेंगीसदृश रुग्ण आढळल्यास माहिती देण्यासाठी प्रशासनाने ग्रुप तयार केला असल्याचे समजते; मात्र या ग्रुपवर यंत्रणेतीलच अधिकारी व कर्मचारी समाविष्ट असल्याने रुणांची नेमकी माहिती उपलब्ध होत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular