26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeMaharashtraमराठा आंदोलक कावळेंची आत्महत्या वांद्रे रेल्वे पुलावर गळफास घेऊन जीवन संपविले

मराठा आंदोलक कावळेंची आत्महत्या वांद्रे रेल्वे पुलावर गळफास घेऊन जीवन संपविले

आरक्षणाच्या मुद्यावर सरकार तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील बाबूराव कावळे यांनी बुधवारी (ता. १९) रात्री उशिरा आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीकेसी कनेक्टर वांद्रे रेल्वे पुलावर दोरीने गळफास घेऊन सुनील यांनी जीवन संपविले. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कावळे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून आरक्षणाच्या मुद्यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर सरकार तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील बाबूराव कावळे यांनी बुधवारी (ता. १९) रात्री उशिरा आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बीकेसी कनेक्टर वांद्रे रेल्वे पुलावर दोरीने गळफास घेऊन सुनील यांनी जीवन संपविले. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कावळे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत असून आरक्षणाच्या मुद्यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर सरकार तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कावळे यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिडी सापडली असून त्यात त्यांनी मराठा समाजासाठी आयोजित केलेला मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली असून मृतदेह सोव येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनील कावळे हे जालना येथील अंबडच्या चिकनगावचे रहिवासी आहेत. मुंबईत २४ ऑक्टोबरला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एका मोर्व्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात सामील होण्यासाठी ते मुंबईत आले होते. बुधवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्यांनी वांद्रे येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर वांद्रे रेल्वे ब्रिजवरील उत्तरवाहिनीवर दोरीच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने त्यांना शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्याकडे पोलिसांना एक बॅग सापडली असून त्यातून एक मोबाईल आणि सुसाइड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. या नोटवरून त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

सुसाईड नोटमध्ये काय ? – सुसाईड नोटमध्ये सुनील यांनी सर्व मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.” मराठा समाजाचा २४ ऑक्टोबरला एक मोर्चा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. दसरा-दिवाळी सण नेहमीच येत असतात; मात्र त्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी करा. मला जे बरे वाटले ते मी केले. मला मोठ्या मनाने माफ करा, मी क्षमा मागतो,” असे सुनील यांनी म्हटले आहे.

सरकारकडून आर्थिक मदत – ‘ते असे काही करतील, असे वाटले नव्हते. हे सर्व आमच्यासाठी अनपेक्षित होते,’ असे सुनील यांचे नातेवाईक सचिन आगलावे यांनी सांगितले. “गेल्या पाच वर्षांपासून ते मराठा संघटनेशी जोडलेले होते. प्रत्येक आंदोलन, मोर्च्यात ते सहभागी व्हायचे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दीपक केसरकर भेटायला आले होते. त्यांनी आर्थिक मदत केली. शासकीय मदतीचे आश्वासन दिले आहे,” असेही आगलावे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular