29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्यातील अनेक महिला, विविध आजारांनी त्रस्त

जिल्ह्यातील अनेक महिला, विविध आजारांनी त्रस्त

महिलांच्या आरोग्य तपासणीबाबतचा माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान जिल्हाभर राबवण्यास सुरवात करण्यात आली आहे.

जिल्हामध्ये माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्वांगीण तपासणीमध्ये जिल्ह्यातील १८ वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडची लक्षणे अधिक प्रमाणात आढळली आहेत. महिलांच्या आरोग्य तपासणीबाबतचा माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान जिल्हाभर राबवण्यास सुरवात करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे एवढाच आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्यसेविका, सेवक घरोघरी जाऊन माहिती देत आहेत.

या अभियांनातर्गत १७ हजार ३१८ गरोदर माता, रक्तदाबाची १६ हजार ५४६, गरोदर, उच्च रक्तदाब निदान झालेल्या माताची संख्या ६९० आहे. थायरॉईडची तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थींची संख्या २ हजार ७२५, हायपर थायरॉईडचे निदान झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २३७, गरोदरपणा दरम्यानचा मधुमेह निदान झालेल्या २६१ मातांचा समावेश आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांची संख्या ३ हजार ४, टीडी लसीकरण केलेल्या गरोदर महिलांची संख्या ३ हजार २९८, कोविड लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांची संख्या ३ हजार २९८, विशेष मोहिमेत ७५२ अति जोखीमग्रस्त माता सापडल्या. गर्भधारणापूर्व समुपदेशन ९६ हजार १८८ लाभार्थ्यांना दिले.

१८ वर्षे वयोगटावरील महिलांना दिलेल्या सेवामध्ये तपासणी करण्यात आलेल्या १८ वर्षे वयोगटातील ५ लाख ७ हजार २३६ लाभार्थी आहेत. बीएमआय (१८.५ पेक्षा) कमी आढळलेले ४ लाख ७९ हजार ९१८ लाभार्थी आहेत. ४ लाख ५२ हजार ३६१ लाभार्थींची रक्तदाब तपासणी झाली. उच्च रक्तदाब निदान झालेल्या ३४ हजार २२१ लाभार्थी आहेत. २ लाख ८१ हजार ५८३ लाभार्थींची एचबी तपासणी केली. रक्तक्षय आढळलेले लाभार्थी १६ हजार ८५२ असून तीव्र रक्तक्षय आढळलेले लाभार्थीं १७०६ आहेत. मधुमेह निदान झालेले १३ हजार १५६ लाभार्थी आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular