कोकण हे कृषी संपन्न असून, अनेक वेगवेगळे उपक्रम राबविण्यामध्ये जिल्ह्याचा क्रमांक अव्वल आहे. अनेक प्रकारची लागवड येथे करून उत्पन्न घेतले जाते. माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या कृषी शिक्षणाचे धोरण निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये आम. शेखर निकम यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या कृषी धोरण निश्चितीसाठी हि समिती निर्माण करण्यात आली आहे. या समितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनसार आम. शेखर निकम यांसह अजून २ आमदारांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी शिक्षण धोरण निश्चित तज्ज्ञ समितीवर चिपळूण-संगमेश्वरचे आम. शेखर निकम यांची निवड झाली असून ते त्यांच्यासह राज्यातील अजून २ आमदारांची या समितीमध्ये निवड केली गेली आहे. परभणी येथील आम. डॉ. राहूल वेदप्रकाश पाटील आणि चंद्रपूर येथील आम. प्रतिभा सुरेश धानोरकर या आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही आमदार देखील उच्चशिक्षित आहेत.
आम. शेखर निकम यांनी कृषीशिक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदवी धारण केलेली असून, कृषी क्षेत्रामध्ये त्यांचे असणारे योगदान निश्चितच मोठे आहे. त्यामुळे कृषी शिक्षण विषयात भविष्यात होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर आम. निकम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव बा.की.रासकर यांनी या झालेल्या निवडीचे पत्र आम. निकम यांना दिले. आम. निकम यांना संधी मिळाल्याने कृषी शिक्षणाचे धोरणामध्ये कोकणातील कृषी विषयाचा समावेश करण्यात येईल. आम.शेखर निकम यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.