27.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKhedखेड तालुक्यात ब्लॅक पँथरचा वावर

खेड तालुक्यात ब्लॅक पँथरचा वावर

ब्लॅक पँथर काही दिवसांपुर्वी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील चाकाळे ब्लॅक पँथर कैद झाला असून या विथील एका शेतघराच्या अंगणात व्हिडिओमधील ब्लॅक पँथरच्या खेड तालुक्यातील अस्तित्वा मुळे प्राणी मित्रांना ही दिलासा मिळाला आहे. खेडमधील शीतल पेठे यांच्या चाकाळे येथील शेत घराच्या अंगणात आलेला बिबट्या अर्थात ब्लॅक पँथर सीसीटीव्हीने अचूक टिपला आहे. अंगणात एका कुत्र्याला देखील त्याची चाहूल लागल्याने तो देखील जोर जोरात ओरडत असल्याचे टिपले गेले आहे. या व्हिडिओमुळे खेड तालुक्यातील ब्लॅक पँथरच्या अस्तित्वाने ही प्रजात तग धरून आहे हे मात्र अधोरेखित झाले आहे. दरम्यान हा ब्लॅक पँथर काही दिवसांपुर्वी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसत आहे. तो भक्ष्याच्या शोधात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

त्यामुळे या प्राण्याची प्रजात ही अन्नाच्या शोधात मानवी वस्तीच्या कुंपणापर्यत धाव घेत असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात वाघासोबत ब्लॅक पँथरच अस्तित्व या अगोदर अधोरेखित झाले. आहे. काळा बिबट्या हा सदाहरित जंगलात आढळतो. सिंधुदुर्गात आतापर्यंत कुडाळ जवळील गोवेरी, भैरवगड परिसर, आंबोली आणि तिलारीच्या जंगलात यापूर्वी ब्लॅक पँथरच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. काही वर्षांपूर्वी राजापूर आणि गुहागर तालुक्यात ब्लॅक पँथर विहिरीत पडल्याचे आढळून आले आणि यांना वन विभागाने यशस्वीरित्या जंगलात पुन्हा सोडून सुद्धा दिले होते.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली आणि कोंडीवरे गावाच्या पंचक्रोशीमध्ये याचे दर्शन वारंवार लोकांना होत असल्याची चर्चा आहे. काळा बिबट्या आढळणे ही बाब तशी दिलासा देणारी असली तरी जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील गावातील जंगला मध्ये या बिबट्या चे अस्तीव आहे. मात्र खेड च्या दृष्टीने ही बाब अतिशय दिलासा देणारी आहे हा बिबट्या वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असल्याचे वन अधिकारी सुरेश उपरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular