26.5 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeDapoliहोळीच्यावेळी झालेल्या वादातून म्हाप्रळमध्ये खून, पोत्यात भरून फेकून दिला मृतदेह

होळीच्यावेळी झालेल्या वादातून म्हाप्रळमध्ये खून, पोत्यात भरून फेकून दिला मृतदेह

तरूणाला लोखंडी रॉडने अमानुष म ारहाण करण्यात आली.

मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ गावी होळीच्यावेळी मित्रांमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्या रागातून एका तरूणाला लोखंडी रॉडने अमानुष म ारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरूणाचा मृत्यू ओढवला. त्यानंतर आरोपींनी हा मृतदेह एका पोत्यात भरला आणि नजीकच्या रायगड ‘जिल्ह्यातील पांगळोली गावी नेऊन टाकला. मात्र पोलीसांनी चातुर्याने तपास करत सुतावरून स्वर्ग गाठला आणि म्हाप्रळमध्ये एका साईटवर काम करणाऱ्या दोघांसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. उमेश पासवान उर्फ बादशाह असे खून झालेल्या कामगाराचे नाव असून तो ४० वर्षाचा होता. तो मूळचा नालासोपारा गावचा रहिवासी असल्याचेही पोलीसांनी सांगितले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाले यांनी याबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. पोलीसांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी म्हसळा पोलीसांना एक मृतदेह पोत्यात भरलेला आढळला. मात्र तो कुजला होता. त्याची ओळख पटवणे जिकरीचे काम होते. पोलीसांनी या कुजलेल्या मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक डायरी सापडली. या डायरीमध्ये एक नंबर होता. तो नंबर श्रीवर्धन तालुक्यातील कोंडा पंचतन इथे राहणाऱ्या संतोष साबळे यांचा होता, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाले यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

उडवाउडवीची उत्तरे – पोलीसांनी हा नंबर डायल करत संतोष साबळेला चौकशीसाठी पाचारण केले. तो छोटी-मोठी रस्त्याची कामे करणारा ठेकेदार असल्याचे पोलीसांनी सांगितले. प्रामुख्याने तो लेबर पुरवण्याचे काम करतो. साबळे पोलीस स्थानकात येताच पोलीसांनी त्याची चौकशी केली. मात्र सुरूवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलीसांनी त्याला बोलते केले. त्याचबरोबर पोलीसांनी सूत्रे हलविली आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर संतोष साबळे याच्या रत्नागिरी जिल्हयातील म्हाप्रळ येथे काम सुरू असलेल्या साईटवर जाऊन २ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा खुनाचा उलगडा झाला. तसेच हा खून आपल्याकडील मजुरांनी केल्याचे कळताच साबळे आणि त्या २ तरूणांनी मृतदेह पोत्यात भरून रायगड जिल्ह्यातील पांगळोली गावी टाकून दिला.

विभागीय अधिकारी सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाले, उप पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर एडवले, संतोष चव्हाण, सागर चितारे, स्वप्नील निळेकर या पोलीस पथकाने तिघांना अटक केली आहे. संतोष साबळे (रा. कोंडा पंचतन), विशाल देवरूखकर (रा. गुहागर), शामलाल मौर्य (रा. उत्तर प्रदेश) अशी या ३ संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवले यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular