21.6 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriसाईश्री नृत्य कला मंदिर आयोजित नृत्य संध्या कार्यक्रम

साईश्री नृत्य कला मंदिर आयोजित नृत्य संध्या कार्यक्रम

५ मे रोजी साईश्री नृत्य कला मंदिर आयोजित नृत्य संध्या कार्यक्रम जयेश मंगल पार्क, माळ नाका, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या वेळी ॲड. राजशेखर मलुष्टे आणि ॲड. सौ. जया सामंत प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम मधील विविध अडवूचे प्रकार सादर केले. तसेच अनेक गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आली. यामध्ये अगदी चिमुकल्या मुलींपासून ते विशारद झालेल्या मुलींपर्यंत सर्वांनीच अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता.

यावेळी साईश्री नृत्य कला मंदिरच्या संचालिका सौ. मिताली भिडे यांनी मुलींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार प्रदान केले. ते पुढीलप्रमाणे-

  1. Consistent student – Nancy
  2. Student of the year in expression – Bhargavi Gokhale
  3. Sincere student of the year – Niraja Kadawekar
  4. Best performing student – Chaitrali Naniwadekar
  5. Student of the year – Kashish Shetye, Mugdha Jamkhedkar
  6. Best performing student – Drushti Virkar
  7. Future talent of the class – Saumyaa Athalye, Durva Agashe

तसेच मलुष्टे सरांनी छोट्या नृत्यांगना कु. सौम्या आठल्ये आणि कु. दुर्वा आगाशे ह्या दोघींचे विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमामध्ये साईश्री नृत्य कला मंदिरच्या संचालिका सौ. मिताली भिडे यांनी घेतलेली मेहनत दिसून आली. सौ. मिताली भिडे यांच्यासह त्यांची विद्यार्थिनी शिवानी केळकर हिने नृत्य बसवण्यासाठी परिश्रम घेतले होते. अतिशय नेटके नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES

Most Popular