26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्याने शिवसेनेंत खळबळ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्याने शिवसेनेंत खळबळ

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये येतील, असं सांगत कोकणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत हे एकाच पक्षाचे असून, त्यांच्यात उघडपणे निर्माण झालेले मतभेद आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत आमच्यातील उत्तम समन्वय आहे, असल्याचं दाखवून दिले. तसेच आगामी निवडणुकांमध्येही हाच समन्वय राहिल याचे संकेत दिले आहेत. तिकडे सिंधुदुर्गात भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये येतील, असं सांगत कोकणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राणे हे शिवसेनेत असताना त्यांनीच राजन साळवींना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केले होते. त्यामुळे साळवी आणि राणे यांचे राजकारणापलिकडेही उत्तम संबंध असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिंदे गटामध्ये गेलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी सुद्धा राजकारणाव्यतिरिक्त त्यांचे चांगले कौटुंबिक संबंध आहेत. रिफायनरीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीला शिवसेनेचे स्थानिक खासदार अनुपस्थित होते. तर आमदार राजन साळवी हे सामंतां सोबत उपस्थित होते. राजन साळवींनी देखील अलीकडेच ‘ये अंदर की बात है राणे भी हमारे साथ है’ असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

चिपळूण येथील चार नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट ही सुद्धा ठाकरे गटाचे टेन्शन वाढवणारी बातमी ठरू शकते. तर दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचा “करेक्ट कार्यक्रम” करण्याचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे दापोली तालुक्यातील एक मोठे नेते घाग यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत मुंबईत झालेल्या जाहीर सभेत प्रवेश केल्याने, हा राष्ट्रवादीसाठी जबरदस्त धक्का आहे.

रत्नागिरी येथील बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकार्‍यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेवून त्यांचे स्वागत केले. भाजप-शिंदे गटातील हा समन्वय दोन्ही पक्षातील संबंध अधिक दृढ करणारा आहे. दोन्ही पक्षांची ही जवळीक भविष्यात ठाकरे सेनेची गणित बिघडविणारी ठरू शकेल. यावरून शिवसेनेत उभी फुट पडली आहे का? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला. आमच्यासाठी ही चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. उभी फुट पडली की ते आमच्याकडे जमा होणार, असे राणे म्हणाले. राजन साळवी भाजपमध्ये येणार का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. येणार असे उत्तर राणेंनी दिलंय. मात्र ते तुम्ही आता चॅनेलला दाखवू नका नाही तर ते मग येणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular