25.8 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriपोर्ट औद्योगिक क्षेत्राला मिऱ्यावासीयांचा विरोध

पोर्ट औद्योगिक क्षेत्राला मिऱ्यावासीयांचा विरोध

सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी जागा त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे.

नवलाई पावनाई देवा, जाकादेवी, आमच्या मिऱ्यावर कोणी वक्रदृष्टी टाकली आहे, त्यांना त्यांची जागा दाखवून दे रे देवा… असे गाऱ्हाणे घालत शहराजवळील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या गावात होणाऱ्या पोर्ट औद्योगिक क्षेत्राला मिऱ्या पंचक्रोशीने एकमुखी विरोध केला. मिऱ्यावासीयांनी यानिमित्ताने एकजूट दाखवली. आलावा येथील पारावर सुमारे तीनशे लोक उपस्थित होते. या प्रकल्पाबाबत पारदर्शकता नाही, म्हणून विरोध असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नुकताच अधिसूचना जारी करून पोर्ट औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यात आले. सुमारे ५०० एकरचा भाग एमआयडीसीने पर्यटन औद्योगिक क्षेत्र घोषित केले आहे.

सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी जागा त्यासाठी संपादित करण्यात येणार आहे. तशा नोटीसा देखील गावकऱ्यांना बजवाण्यात आल्या. पर्यटनावर आधारित एखादा उद्योग किंवा फूड प्रोसेसिंगवर आधारित उद्योग तेथे येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु याबाबत स्थानिकांना विश्वासात न घेतला हा कार्यवाही करण्यात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे यापूर्वी सडामिऱ्या-जाकीमिऱ्या दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा झाल्या त्यामध्ये एकमताने या प्रकल्पाला विरोध झाला.

त्यानंतर संपुर्ण मिऱ्या पंचक्रोशीची आज एकत्रित बैठक लावण्यात आली. आलावा येथील पारावर ही बैठक झाली. माजी आमदार बाळ माने, कौस्तुभ सावंतआदींनी त्याचे नेतृत्व केले. मोठ्या संख्येने मिऱ्यावासीयांनी एकजुट दाखवली. आम्हाला विश्वासात न घेता ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत एकमुखी निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular