27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriरेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत अधिकाऱ्यांनी घेतली सभा

रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत अधिकाऱ्यांनी घेतली सभा

या पोर्टमुळे काळबादेवी समुद्र खाडीला धोका निर्माण होऊ शकतो.

रेवस-रेड्डी सागरी महाम ार्गाच्या भूसंपादनावरुन वाद निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काळबादेवी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांसाठी प्रेझेंटेशन दिले. नियोजित रस्ता कसा जाणार आहे याची माहिती दिली. मात्र ग्रामस्थ आपल्या मूळ मागणीशी ठाम आहते. ज्याप्रमाणे काळबादेवी ग्रामपंचायतीने सर्वानुमते पीर दर्गा येथील धूपप्रतिबंधक बंधारा ते आरे असा समुद्राला समांतर रस्ता न्या ही मागणी त्यांनी पुन्हा एकदा रेटून धरली. भूसंपादन प्रक्रिया आणखी रखडली आहे. ग्रामपंचायतीत येऊन रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील प्रस्तावित पूल आणि अॅप्रोच रस्ता याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली होती.

हा महामार्ग करताना कोणाचेही घर, मंदिर, मशीद तुटणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधण्यास सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्र रस्ते विकास. महामंडळाचे अधिकारी काळबादेवीत आले होते. त्यांनी नियोजित रस्ता कसा जाणार? याची माहिती दिली. यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या सूचना ऐकून घेतल्या. सर्व ग्रामस्थांनी आपल्या सूचना लेखी स्वरुपात द्याव्यात, तक्रारी असतील तरीही त्या लेखी स्वरुपात याव्यात असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

दरम्यान ग्रामस्थांनी आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही परंतु आमची घरे उद्ध्वस्त होणार नाही याची खबरदारी शासनाने घ्यावी अशी विनंती केली. दरम्यान काही ग्रामस्थांनी मिऱ्या येथे होणाऱ्या एमआयडीसी आणि लॉजिस्टीक पोर्टलाही विरोध दर्शविला. या पोर्टमुळे काळबादेवी समुद्र खाडीला धोका निर्माण होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात पाणी पीर दर्गा ते पारकरवाडीपर्यंत घुसू शकते असे ग्रांमस्थांनी सांगितले. यामध्ये अनेक चाकरमान्यांचाही सम ावेश होता.

संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याचे प्रेझेंटेशन देताना पीर दर्गा ते रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर मंदिर ते आरे हा रस्ता कोणत्या प्रकारे मार्गस्थ होईल हे सांगितले. मात्र रामेश्वर मंदिर ते शेटेवाडी दरम्यान काही घरांना धोका निर्माण होऊ शकतो असेही अनेक ग्राम स्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जोपर्यंत या तक्रारींचे निरसन होत नाही तोपर्यंत भूसंपादन प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

धनदांडग्यांची रिसॉर्ट वाचवण्यासाठी खटाटोप ? – रेवस’ रेड्डी मार्गावरील काळबादेवी मिऱ्या पूल आणि प्रस्तावित रस्ता व भूसंपादन हा विषय गेल्या महिन्यापासून गाजत आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की आरे-वारे पूलापासून समुद्राला लगत पीर दर्यापर्यंत महामार्ग नेण्यात यावा. यामुळे कोणाचीही घरे बाधित होणार नाहीत. सागरी महामार्ग असे नाव देण्यात आल्याने पर्यटनाला चालना मिळेल. रायगड जिल्ह्यातील अलिबाग (नागाव) प्रमाणे याठिकाणी पर्यटनाला उभारी मिळेल. मात्र पूलापासून अॅप्रोच रोड आणि पुढील मार्ग हा मानवी वस्तीतून काढण्यात आल्याने ग्रामस्थांनी विरोध सुरु केला.

नवीन प्रस्तावाप्रमाणे रामेश्वर मंदिर ते शेट्येवाडी, पुढे टेंबरेवाडी आणि पुढे काळबादेवी खाडी असा हा मार्ग पुढे जाणार आहे. मात्र तरीही शेट्येवाडीतील काही घरे प्रभावित होत आहेत. जर ही घरे उध्वस्त करुन महामार्ग नेणार असेल तर समुद्राला समांतर महामार्ग नेऊन समस्या का सोडवत नाहीत की या समुद्राला लागून सीआरझेडचे उल्लंघन करुन धनदांडग्यांनी बांधलेली रिसॉर्ट वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे असा सवाल काळबादेवी ग्रामस्थांनी केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular