25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRajapurरानटी जनावरांचा भातशेतीमध्ये धुडगूस, शेतकऱ्यांचे नुकसान

रानटी जनावरांचा भातशेतीमध्ये धुडगूस, शेतकऱ्यांचे नुकसान

पावसाने मारलेल्या दडीमुळे भातशेतीवर करपा आणि निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव झाला.

कमी कालावधीचे आणि हळव्या जातीचे काही भागातील भातपीक कापणीयोग्य झाले आहे. मात्र, डुक्करांसारख्या रानटी जनावरांच्या शेतावर चालणाऱ्या ‘रात्रीच्या खेळा’ने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर टाकली आहे. रात्री शेतामध्ये घुसून रानडुक्करांसारखे प्राणी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे भातशेतीचा हातातोंडाशी आलेला घास तर, हिरावून घेतला जाणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. भात लावणी झाल्यानंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे भातशेतीवर करपा आणि निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव झाला. अनेक भागांतील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

भाताची रोपे सुकून गेल्याने वा किडीने फस्त केल्याने होणाऱ्या संभाव्य नुकसानीने शेतकरी आधीच चिंताक्रांत आहे. जास्त कालावधीच्या भात शेतीला लोंब्या तयार झाल्या आहेत. कमी कालावधीच्या आणि हळव्या जातीची भातशेती काही भागांतील कापणी योग्य झाली आहे. या भात शेतीचे रानटी जनावरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. रात्रीच्यावेळी झुंडीने येणारी ही रानटी जनावरे शेतामधून धुडगूस घालून नुकसान करीत आहेत. या रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे वनविभाग कोणती पावले उचलतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहीले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular