रत्नागिरी इन्फिगो आय केअर सेंटरतर्फे काचबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काचबिंदू या विषयाचे स्पेशालीस्ट नसून रत्नागिरीमध्ये काही वर्षांपूर्वी सुरु झालेल्या साळवी स्टोप येथील इन्फिगो हॉस्पिटलमध्ये काचबिंदू वरील उपचारांसाठी हा विशेष विभाग सुरु करण्यात आला आहे.
काचबिंदू म्हणजे नक्की काय! त्यावर कशा प्रकारच्या उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो, त्यावरील उपचारांवर येणारा खर्च याबद्दल इत्यंभूत माहिती या शिबिरामध्ये देण्यात येणार आहे. काही जणांमध्ये वयोमानानुसार तर काही लहान बालकांमध्येही हल्ली डोळ्यांचे विकार मोठ्या प्रमाणात उद्भवू लागले आहेत. काही जणांची तर अगदी लहान वयामध्ये सुद्धा मोतीबिंदूची ऑपरेशन झालेली ऐकिवात आहेत. काही जणांमध्ये असलेला नजरेचा दोष, रेक्टीनाचा त्रास, शरीरातील सह्व्याधीमुळे नजरेत जाणवणारा फरक, अचानक दृष्टी कमी येणे, इत्यादी अनेक डोळ्यासंबंधी समस्या निर्माण होताना दिसतात. डोळ्यामध्ये काचबिंदू होणे हे डोळ्यासाठी किती घातक असते, तसेच हा काचबिंदू झाल्यावर पूर्णपणे नजर जाण्याचा संभाव्य धोका निर्माण होतो, त्यासाठी डोळ्यांची नियमित काळजी घेणे गरजेचे असते. डोळ्याचे प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, डोळ्यामध्ये काचबिंदू तयार होण्याची कारणे, इ. अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या शिबिरामध्ये मिळू शकतात.
त्यासाठी रत्नागिरी इन्फिगो आय केअर सेंटर तर्फे दिनांक २८ व २९ मे २०२१ रोजी काचबिंदू किंवा ग्लूकोमाच्या रूग्णांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीमध्ये काचबिंदू ची समस्या जाणवणारे अनेक रुग्ण असून अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. या शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ अशी ठेवण्यात आली आहे. व पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले आहे.