27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriरत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, राजेश सावंत

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, राजेश सावंत

पालकमंत्री उदय सामंत यांनी कालच या जागेवर शिवसेनेचा दावा असल्याचे जाहीर केले होते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार असेल. या मतदारसंघात नक्की कमळ फुलणार, असे स्पष्ट करत भाजप दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी या मतदारसंघावर भाजपचा दावा केला आहे. आज भाजप कार्यालयात जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्याच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब माने उपस्थित होते. बाळ माने हे सुद्धा खासदारकीची निवडणूक लढवू शकतात. ते माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष असून, त्यांचे दोन्ही जिल्ह्यांत संपर्क आहे. पक्ष निर्णय घेईल, असेही राजेश सावंत म्हणाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी कालच या जागेवर शिवसेनेचा दावा असल्याचे जाहीर केले होते. या संदर्भात आज राजेश सावंत यांनी या जागेवर भाजपचा दावा असल्याचे सांगितले.

यापूर्वी या लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युती असल्याने युतीचे उमेदवार विनायक राऊत हे दोनवेळा खासदार बनले; परंतु शिवसेनेतील फुटीमुळे आता शिंदे गट व ठाकरे गट झाले आणि सत्तेमध्ये शिंदे गट व भाजप आहेत. अशा वेळी शिंदे गटाकडून सामंत या जागेवर दावा करत आहेत आणि भाजपनेही या जागेवरच दावा केला आहे. यापूर्वी लोकसभा मतदार संघ प्रमुख प्रमोद जठार यांनीदेखील या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आता या मतदारसंघात रणसंग्राम सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असतानाही या मतदार संघावर दोघेही दावा करू लागले आहेत.

टाळ मोर्चानंतर पालिकेला जागा – शहरातील खड्डे, मोकाट गुरे आणि पाणीयोजनेच्या प्रश्नाबाबत नगरपालिकेवर टाळ मोर्चा काढून आरती केल्यानंतर पालिकेला जाग आली. कालच दिवसभरात अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले. पाणीयोजनेबाबतही आम्ही लक्ष देत आहोत तसेच मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव दिल्याचे राजेश सावंत यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular