26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriकेरळच्या धर्तीवर संगमेश्वरमध्ये साबुदाण्याच्या लागवडीचा प्रयोग

केरळच्या धर्तीवर संगमेश्वरमध्ये साबुदाण्याच्या लागवडीचा प्रयोग

साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे.

केरळप्रमाणेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे साबुदाणा झाडांची लागवड केली आहे. केरळातील रवी नीलांबत यांनी संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे पाच-सहा वर्षांपूर्वी अननसची लागवड केली. यामध्ये त्यांना चांगले यश आले. शेवरकंद म्हणजे साबुदाण्याच्या झाडांची लागवड कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. केवळ सहा ते सात महिन्यांचे पीक, साबुदाण्याला बाजारात वर्षभर असणारी मागणी तसेच उत्पादनाला मिळणाऱ्या दरामुळे साबुदाणा लागवड किफायतशीर ठरत आहे. आर्थिक सुबत्तेसाठी शेतकऱ्यांनी या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळण्याची गरज आहे.

अननसापासून त्यांना भरघोस उत्पादन मिळाले आहे. कोकण आणि केरळ येथील हवामान साधारण सारखेच असल्याने येथे साबुदाणा लागवड करून तिथे उत्तम पीक मिळू शकते, असा विश्वास असल्याने त्यांनी कोंडिवरे येथे प्रायोगिक साबुदाणा झाडांची लागवड केली. साबुदाणा शेती उत्तम होत असल्याने आता सुमारे पाच एकर क्षेत्रावर साबुदाणा झाडांची लागवड केली आहे. काकडीसारखे विविध आंतरपिक साबुदाणा लागवडीसोबत घेण्यात येते. सुरवातीला दोन टन साबुदाणा झाडांचे कंद मुंबई येथे पाठवण्यात आले.

कृषिक्षेत्रातही आता आधुनिकतेचे वारे वाहू लागले आहेत. शेतकरी देखील भात शेती सोबत विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांद्वारे स्वत:च्या आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परिणामी येथील शेतामध्ये विविध पिके डोलताना दिसत आहेत. कोकणातील हवामान व जमिनीला मानवणारे शेवरकंद म्हणजेच साबुदाण्याच्या झाडांची लागवड फायदेशीर ठरत आहे. आर्थिक सुबत्तेसाठी येथील शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण पिकाच्या लागवडीकडे वळणे गरजेचे आहे.

साबुदाण्याला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केवळ सहा ते सात महिन्यांत हे पीक तयार होते. साबुदाण्याच्या पावडरला बाजारात प्रतिकिलो सुमारे ५५ रुपये दर मिळतो. प्रतिकिलो कंदाला दहा रुपये दर मिळतो. साबुदाण्याची पावडर घरीच बनवता येत असल्याने शेतकऱ्यांना यापासून गृहोद्योगही सुरू करता येतो. त्यामुळे हा नाविन्यपूर्ण प्रयोग शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular