24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeRajapurनाणार, घोडेपोईवाडीसह सागवेतही बॉक्साईट प्रकल्प

नाणार, घोडेपोईवाडीसह सागवेतही बॉक्साईट प्रकल्प

प्रकल्पाची जनसुनावणी २९ ऑगस्टला नाणार येथे होणार आहे.

नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजून एका बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्य शासनाने केली असून या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता कात्रादेवी मंगल कार्यालयात होणार आहे. रिफायनरी प्रकल्पाची प्रतीक्षा असताना किनारपट्टी पोखरणारे बॉक्साईट उत्खननाचे प्रकल्प तालुकावासीयांच्या माथी मारले जात असल्याने याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. नाणार परिसरातील सुमारे १४५ हेक्टरवर होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाच्या प्रकल्पाची जनसुनावणी २९ ऑगस्टला नाणार येथे होणार आहे.

त्याबाबतची जाहीर नोटीस शासनाने प्रसिद्ध करून आठवड्याचा कालावधी लोटण्याअगोदरच आता शासनाने सागवे घोडेपोईवाडी येथे प्रस्तावित असणाऱ्या दुसऱ्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावणीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर या भागात रिफायनरीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बॉक्साईट उत्खननविरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. कोकणात पर्यावरणपूरक उद्योग आणा, येथील निसर्गाची हानी करणारे प्रकल्प आम्हाला नकोत अशी मागणी येथील जनतेची असताना आता संपूर्ण कोकणपट्टी पोखरणारे प्रकल्प या परिसरात येऊ घातल्याने जनक्षोभ उसळण्याची दाट शक्यता आहे.

सागवे घोडेपोईवाडी येथे १२०.४८ हेक्टरवर हा बॅक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित असून गामा आर्यन इंडिया लिमिटेड ही कंपनी याठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन करणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक कार्यालय यांनी याबाबतची जाहीर नोटीस ३ ऑगस्टच्या पत्राने सागवे ग्रामपंचायतीला कळवले आहे. भारत सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने १४ सप्टेंबर २००६ ला या प्रकल्पाची अधिसूचना काढली आहे… सावगे हमदारे घोडेपोईवाडी येथील १२०.४८ हेक्टर क्षेत्रावर प्रतिवर्ष ०.३ टन उत्खनन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular