25.3 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeEntertainmentसाराची लग्नासाठी एकमेव विशेष अट

साराची लग्नासाठी एकमेव विशेष अट

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या सोशल मीडियावर एका विषयांवरून चर्चेत आहे. साराचा नवीन चित्रपट अतरंगी रे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. साराने आतापर्यंत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष याने अतरंगी रे चित्रपटात सारा, अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून त्यातील साराच्या नृत्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. सध्या सारा या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये साराने तिला हव्या असलेल्या जोडीदाराबद्दल सांगितलं. सारा अनेकदा तिच्या आई-वडिलांच्या नात्याबद्दल मोकळेपणे बोलते. दिलेल्या मुलाखतीमध्ये साराने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. या मुलाखतीत साराने लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे हे सांगितलं. लग्नासाठी साराने विशेष एकच अट ठेवली आहे.

मी आणि माझी आई अमृतासोबत कायमचा राहण्यासाठी जो मुलगा तयार असेल, अशाच मुलासोबत लग्न करण्याचे साराने म्हटलं आहे. साराचं तिच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. अमृता सिंग हिने सिंगल मदर बनून बालपणापासून साराची खूप काळजी घेतली आहे. साराने नेहमीच तिच्या आणि आईच्या घट्ट नात्याबद्दल सांगताना थकत नाही.

सारा तिच्या आईच्या खूप जवळ आहे. लग्नानंतर सारा आपल्या आईला सोडून कुठेही दूर जाऊ इच्छित नाही. त्यामुळेच साराने लग्नासाठी ही विशेष अट ठेवली आहे. सारा सैफ अली खान आणि अमृता यांच्या नात्याबद्दल कायमच बिनधास्तपणे बोलत आली आहे. सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाल्यावर देखील आपण आनंदित झालो होतो असंही साराने एकदा म्हटले होते.

सध्या सारा ‘अतरंगी रे’ च्या प्रदर्शनामध्ये बिझी आहे. आणि तेवढीच उत्सुकता देखील आहे. येत्या काही आठवड्यामध्ये साराचा ‘अतरंगी रे’ बॉक्स ऑफिसवर किती धमाल उडवतो हे कळेल. त्यामुळे पाहूया साराची अट मान्य करून कोण लग्नाला तयार होतो.

RELATED ARTICLES

Most Popular