25.3 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedखेड घाणेखुंटमध्ये ८ लाखाचा गुटख्याचा अवैध साठा जप्त

खेड घाणेखुंटमध्ये ८ लाखाचा गुटख्याचा अवैध साठा जप्त

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यंतरी अमली पदार्थची बेकायदेशीर रित्या विक्री करण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. ग्रामीण भागामध्ये छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे आता शहरी भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या विक्रीच्या घटना घडताना दिसत आहेत.

महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी कायदा असल्याने त्याची विक्री सुद्धा चोरी छुपे केली जाते. अनेक दुकानांमध्ये गुटखा समोर विक्रीला न ठेवता गोडावून मध्ये लपवून ठेवला जाऊन त्याची अवैधरित्या विक्री केली जाते. खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळीवाडी येथे दुकानामध्ये गुटखा विक्री व गोडाऊनमध्ये साठा करून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, घाणेकर, पोलीस शिपाई संकेत गुरव , रूपेश पेढामकर विनायक येलकर यांच्या पथकाने गवळीवाडी येथे धाड टाकली.

पोलिसांना त्या ठिकाणहून ८ लाख ६ हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी तैयब सत्तार मेमन याला मुद्देमालासह अटक करण्यात आले असून याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुटख्याचे सुद्धा अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यामधील एमआरडी व विमल गुटखा हे दोन प्रकार घटनास्थळाहून जप्त करण्यात आले आहेत. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

तंबाखूचे दुष्परिणाम ज्ञात असूनसुद्धा अनेकांचे हे व्यसन सुटत नाही. त्यामध्ये अवैधरीत्या विकल्या जाणार्या अशा पदार्थांवर वेळीच शासनाने रोख लावली पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular