27.9 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriरत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

रत्नागिरीत पाणी टंचाई, शीळ धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

मान्सून लांबल्यास रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे यावर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीपासूनच पाणीकपात होण्याची शक्यता आहे. आठवड्यातून एकदा की एकदिवसाड पाणीपुरवठा करायचा, याबाबत रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन केले जात आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून एकदिवसाआड पाणीपुरवठा केला गेला आहे. रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा एकट्या शीळ धरणावर अवलंबून आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. हे पाणी दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरवठ्यास येते. सध्या शीळ धरणात १.४०० द.ल.घ.मी. इतका असून, आहे. पाणीसाठा तो जून अखेरीपर्यंतच पुरणारा आहे.

पानवल धरण आणि नाचणे तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहे. नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू असल्याने या दोन्ही ठिकाणचे पाणी शहरवासीयांना देता आले नाही. त्यामुळे शीळ धरणावरचा भार वाढला.पानवल धरणात ५११ द.ल.घ.मी. पाणीसाठा असतो. इतके पाणी शीळ धरणातूनच द्यावे लागले आहे. संपूर्ण देशातील मान्सून लांबणीवर पडण्याचा आणि पावसाचे सर्वसाधारण प्रमाण कमी असण्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणातील पाणीसाठा मान्सून सुरू होण्यापूर्वीच संपला तर पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी, पाऊस लांबल्यास शहराच्या पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular