29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeEntertainmentसिद्धार्थ जाधवच्या वैवाहिक जीवनात वादळ ! प्रकरण विभक्त होण्याच्या मागावर

सिद्धार्थ जाधवच्या वैवाहिक जीवनात वादळ ! प्रकरण विभक्त होण्याच्या मागावर

सिद्धार्थ जाधव याच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसलंय, गेले काही दिवस तो आपली पत्नी तृ्प्ती आणि दोन मुली यांच्या पासून अलिप्त राहत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील कलाकार सिद्धार्थ जाधवच्या वैवाहिक जीवनात उठलेल्या वादळावरून सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेले दोन वर्ष सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यामध्ये काहीतरी बिनसले असून वारंवार खटके उडत होते. गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र देखील राहत नाहीत. त्याच्या दोन मुली देखील त्याच्या पत्नीसोबत राहत आहेत. दोघांमधलं वादाचं कारण मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. दोघंही विभक्त होण्याच्या मार्गावर मात्र आहेत असंही विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. सध्या हे दोघं दुबईत आपल्या मुलींसोबत हॉलिडेसाठी गेले आहेत. पण दोघांचं इन्स्टा प्रोफाईल तपासले असता, तर दुबईतील पोस्ट केलेल्या फोटोत दोघांचा एकमेकांसोबतचा एकही फोटो काढलेला नाही.

आजकाल अनेक सेलिब्रिटी जरी विभक्त झाले असले तरी, आपल्या मुलांसाठी ते एकत्र आलेले दिसत आहेत. त्यामध्ये एकत्र लंच, डिनरला जाणे, मुलांना घेऊन हवापालट करण्यासाठी हॉलिडेवर जातात. तसंच,सिद्धार्थ आणि तृप्ती सध्या दोन्ही मुलींसमवेत दुबईत गेले आहेत असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. सेलिब्रिटींचे अफेअर्स, विवाह सोहळे जेवढे गाजतात, किंबहुना त्याहून अधिक गाजतात ते त्यांचे हाय प्रोफाईल घटस्फोट, सिनेइंडस्ट्रीत तर असे अनेक घटस्फोट समोर आले आहेत की त्यामुळे चाहत्यांना अनेकदा धक्का बसला आहे.

कालपरवा पर्यंत यांच्यात सर्व गोड होतं, मग आता असं अचानक काय झालं जे प्रकरण घटस्फोटा पर्यंत आले? असा प्रश्न एका सामान्य चाहत्याला सतावू लागतो. नेहमीच बॉलीवूडमध्ये घटस्फोट जास्त होतात असं आपण म्हणत आलोय पण आता तिथलं वारं मराठी इंडस्ट्रीकडेही वळल आहे म्हणण वावग ठरणार नाही. आपल्या सर्वांचा मराठीतला लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी बिनसलंय, गेले काही दिवस तो आपली पत्नी तृ्प्ती आणि दोन मुली यांच्या पासून अलिप्त राहत आहे.

२००७ सालामध्ये सिद्धार्थ आणि तृप्ती यांचे लग्न झालं होतं. त्यांना दोन गोड मुली देखील आहेत. त्या दोघांची लव्हस्टोरी पण एकदम सॉलीड आहे,  सिद्धार्थ अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत असताना त्यानं पत्रकार असलेल्या तृप्तीला प्रपोज केलं होते, पण तृप्तीनंही अगदी वेळ घेऊन त्याला होकार दिला.

RELATED ARTICLES

Most Popular