सलग २ दिवस खेडमध्ये गोवंशसदृश्य प्राण्याचे अवयव आणि मांस सापडल्याने खेड शहरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा समस्त खेडवासीयांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळून निषेध नोंदविला. खेड बाजारपेठेतील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बंद ठेवत आरोपींवर कडक कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. सोमवारी यातील ३ संशयित होती. मंगळवारी आणखी एकाला आरोपींना अटक करण्यात आली पकडण्यात आले आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन डीएसपी कुलकर्णी यांनी नागरिकांना दिले आहे. लोकांनी शांतता पाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान खेडमध्ये असलेले संतापाचे वातावरण लक्षात घेवून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. खेडमध्ये पूर्णतः शांतता आहे.
सलग २ दिवस – खेड शहर ते खाडीपट्टा म ार्गावरील देवणे पुलाखाली सलग २ दिवस गोवंशसदृश्य प्राण्याचे काही अवयव सापडले होते. त्यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत होता. लोकं मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी समाजकंटकांना अटक करा अशी मागणी करत जनतेने रास्तारोको आंदोलनही केले. पोलीसांनी परिस्थिती कौशल्याने हाताळली. गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनीदेखील पोलीसांना २४ तासाच्या आत कारवाई झाली पाहिजे अशा सूचना देत जनतेला शांतता पाळण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
४ संशयितांना अटक – रविवारनंतर सोमवारी पुन्हा एकदा असेच अवयव देवणे पुलाखाली आणि नदीशेजारी आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. हे कोणीतरी जाणूनबुजून करत आहे असा संशय बळावत होता. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र पोलीसांनी पुन्हा एकदा परिस्थिती कौशल्याने हाताळली आणि शांतता भंग होऊ दिला नाही. तसेच ३ संशयित आरोपींना अटकही केली. मात्र यामुळे जनतेमध्ये जो संताप व्यक्त होत होता त्याचे रूपांतर मंगळवारी खेडमध्ये पाळण्यात आलेल्या बंदमध्ये दिसून आले.
कडकडीत बंद – या गोवंशसदृश्य प्राण्यांच्या हत्येच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली. खेडमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. बाजारपेठेतील दुकाने बंद होती. शाळादेखील बंद करण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांनी जनतेला शांततेचे आवाहन पुन्हाएकदा केले. पोलीसांच्या आवाहनाला सहकार्य करत मोर्चा रह करण्यात आला. मात्र कडकडीत बंद पाळून जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या.
आणखी एकाला पकडले – सोमवारी ३ संशयित आरोपींना पकडण्यात आले होते. मंगळवारी आणखी एकाला पकडण्यात आले असून एकूण ४ संशयित आरोपींना पकडले आहे. बंदला सुरूवात झाल्यानंतर शेकडोंच्या संख्येने नागरिक खेड पोलीस स्थानकाबाहेर एकवटले होते. तेथे त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि पुन्हा असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे जनतेचे म्हणणे होते.
उत्स्फूर्त बंद – मंगळवारी खेडमध्ये पाळण्यात आलेला कडकडीत बंद हा उत्स्फ र्त होता. कोणीही जबरदस्ती केली नव्हती. मात्र जनतेच्या मनात जो संताप खदखदत होता त्याची ती उत्स्फ र्त प्रतिक्रिया होती. हा बंद शासकीय यंत्रणा आणि पोलीसांच्या विरोधात नव्हता तर जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ होता असे स्पष्ट करण्यात आले. खेड शहरात पूर्णतः शांतता आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे – या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीसांचे एक पथक या सर्व प्रकरणाचा योग्य दिशेने तपास करीत असल्याने या घटनेच्या मुळाशी जाऊन सुत्रधारापर्यंत आम्हीं लवकरच पोहोचून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू. खेडवासियांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी माहिती मंगळवारी दुपारी येथील पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व पोलीस निरीक्षक नितीन भोयर उपस्थित होते. खेड शहरात १४४ कलम लागू करण्यात आले असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.