रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव फणसवाडी येथील तरुण होमगार्ड कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. कापडगाव परिसरात तरुण होमगार्डने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. प्रथमेश राजाराम पाडावे (वय २५, रा. कापडगाव-फणसवाडी, रत्नागिरी) असे मृत होमगार्डचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. ही घटना रविवारी (ता. १५) दुपारी साडेबाराच्या सुमारास कापडगाव येथे घडली.
पंचवीस वर्षाचा प्रथमेश पाडावे हा २०२१च्या होमगार्ड भरतीमध्ये दाखल झाला होता. होमगार्ड मध्ये त्याला एक वर्ष झाले होते. रत्नागिरी होमगार्डमध्ये तो कर्तव्य बजावत होता. त्याच्या लग्नालाही एक वर्षे दोन महिने झाले होते. येथे घडली. पंचवीस वर्षाचा प्रथमेश पाडावे हा २०२१च्या होमगार्ड भरतीमध्ये दाखल झाला होता. होमगार्ड मध्ये त्याला एक वर्ष झाले होते. रत्नागिरी होमगार्डमध्ये तो कर्तव्य बजावत होता. त्याच्या लग्नालाही एक वर्षे दोन महिने झाले होते.