23 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriठाकरे गटाच्या बैठकीत गद्दारीवरून राडा, जिल्हास्तरीय नेत्याच्या अंगावर चाल

ठाकरे गटाच्या बैठकीत गद्दारीवरून राडा, जिल्हास्तरीय नेत्याच्या अंगावर चाल

या बैठकीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत विधानसभेवेळी सर्वच गटांमध्ये घटलेले मताधिक्य आणि फितुरीवरून जोरदार राडा झाला. माजी खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्यासमोरच नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी, तर बैठकीतच पदाचा राजीनामा देण्याचे स्पष्ट केल्याने ठाकरे गटातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बैठकीत पिछाडीबाबत चर्चा करताना अनेक नवे-जुने विषय बैठकीत समोर आले. माजी खासदार आणि ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत संपर्क कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. लोकसभेला दहा हजारांचे मताधिक्य असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाहीत. जवळपास सर्वच जिल्हा परिषद गटात ठाकरे गटाचे उमेदवार पिछाडीवर राहिले. यावर चर्चा करताना अनेक नवे-जुने विषय कार्यकारिणीच्या बैठकीत समोर ठेवले.

जिल्हा पातळीवरील नेत्याच्या अंगावर माजी पंचायत समिती सदस्य धावून गेले. सचिवांच्या पुढे हा सर्व ड्रामा सुरू होता. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सहसंपर्कप्रमुख राजू महाडिक निवडणुकीदरम्यान कुठेच दिसले नाहीत, असा आरोप करून तीव्र नाराजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. काही पदाधिकाऱ्यांवर गद्दारीचा आरोप करण्यात आला. त्यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे प्रचंड संतप्त झाले. सर्वच पदाधिकाऱ्यांनी बैठकीमधून उठत श्रद्धास्थान असलेल्या हातिस येथील पीर बाबरशेख येथे जाऊन गद्दारीबाबत शपथ घेऊया, असे सांगितले; परंतु माजी खासदार राऊत यांनी सर्वांना शांत राहून काम करण्याचा सल्ला देत बैठकीचा नूर पालटण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी एकसंधपणे काम करू व उद्धव ठाकरे यांचा पक्ष अधिक बळकट करू, असे सांगितले.

या गरमागरम बैठकीची चर्चा रंगली असून, गद्दारांवर कारवाई करा, अशी मागणी होत आहे. या बैठकीत जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे यांच्यासह विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अनेक जण नाराज – या बैठकीत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनीही राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आता कुणीतरी नव्या चेहऱ्याने जबाबदारी घ्यावी, असे सांगितले. त्यानंतर काही विभागप्रमुखांनीही राजीनामा देणार असल्याचे बैठकीत सांगितले. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटात सुरू असलेल्या नाराजीनाट्याला या बैठकीत चांगलीच हवा मिळाली.

RELATED ARTICLES

Most Popular