26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeDapoliमध्यरात्रीनंतर हातपाय बांधून घरात घुसलेल्या तिघांनी घरमालकाचे कोयत्याचा धाक दाखवत केली चोरी

मध्यरात्रीनंतर हातपाय बांधून घरात घुसलेल्या तिघांनी घरमालकाचे कोयत्याचा धाक दाखवत केली चोरी

सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ९१ हजार रूपयांचा ऐवज लांबविला.

मध्यरात्री उशीरा घरात घुसलेल्या तिघांनी बेडरूममध्ये झोपलेल्या इसमाचे हातपाय बांधत आणि मानेवर कोयता ठेवत त्याला ठार मारण्याची धमकी देत घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ९१ हजार रूपयांचा ऐवज लांबविला. मंडणगडजवळच्या सडे मानेवाडी येथे झालेल्या या प्रकाराने मंडणगड परिसरात खळबळ उडाली आहे. या चोरीविषयी पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, नंदकिशोर परशुराम माने (वय ६५, राहणार सडे मानेवाडी) यांनी पोलीस स्थानकात १० एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली आहे. ९ एप्रिल रोजी ते आपल्या घरी रात्री १०.०० वाजण्याचे सुमारास जेवण आटपून झोपी गेले. मध्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेल्या ३ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात किचनची स्लायडींग खिडकी सरकवून प्रवेश केला. माने यांना काहीतरी वाजल्याचा आवाज आला आणि ते जागे झाले.

ते बेडवरुन उठण्याचा प्रयत्न करत असताना तोंडावर रुमाल बांधलेल्या ३ अज्ञात इसमांनी त्यांना पकडले. त्यांचे हात व पाय टॉवलेच्या मदतीने बांधले. त्यांच्या मानेवर घरातील कोयती ठेवून ‘जर तू ओरडण्याचा प्रयत्न केलास तर तुला जीवे ठार मारु’ अशी धमकी दिली. तीन इसमांनी त्यांच्या तोंडावर चादर टाकून बेडरुममधील कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व उषाखाली ठेवलेली सुमारे ४ तोळे सोन्याची चेन चोरी करुन घेऊन गेले. घरातील ५५ हजार रुपयांची रोख रक्कम व २ लाख ३६ हजार रुपये किमंतीची ४ तोळ्याची चेन असा ऐवज चोरून नेला. त्यामुळे मंडणगड पोलीस स्थानकात चोरी करणाऱ्या ३ अज्ञातांचे विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३९ (४). ३०५, ३३१ (४) ३५१(२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular