27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर तीन गाड्या धावणार…

कोकण रेल्वे मार्गावर तीन गाड्या धावणार…

गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ तसेच उधना ते मंगळूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांच्या आणखी काही फेऱ्या जाहीर केल्या आहेत. गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ तसेच उधना ते मंगळूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी याआधी फेऱ्या जाहीर झाल्या आहेत. त्यात आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर आणखी काही गाड्यांची भर पडली आहे. उधना ते मडगाव ही द्वि साप्ताहिक गाडी १६, २० व २३, २७, ३० सप्टेंबरला उधना येथून दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती मडगावला पोचेल.

परतीच्या प्रवासात मडगाव येथून उधनासाठी निघणारी गाडी १७, २१, २४, २८ सप्टेंबर, १ ऑक्टोबरला या दिवशी गणपती स्पेशल गाडी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि सुरत जवळील उधना येथे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ते पोहोचेल. या गाडी शिवाय अहमदाबाद ते कुडाळ मार्गावरील गणपती विशेष गाडी ही आठवड्यातून एकदाच होणार आहे. ही गाडी १२, १९ व २६ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथून तर १३, २० व २७ सप्टेंबरला कुडाळ येथून सुटणार आहे. तिसरी विशेष गाडी उधना ते मंगळूर दरम्यान आठवड्यातून एकदा जाणार आहे. ही गाडी उधना येथून १३, २९ २७ सप्टेंबरला, तर मंगळूर येथून उधनासाठी दिनांक १४ २१ व २८ सप्टेंबरला सुटणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular