23.2 C
Ratnagiri
Thursday, February 13, 2025

बारावी परीक्षा ३८ केंद्रांवर सुरूपुष्प देऊन प्रोत्साहन…

बारावीच्या लेखी परीक्षेला आज शांततेत सुरुवात झाली....

चारचाकी असलेल्या बहिणी अडचणीत, जिल्हा प्रशासनाला यादी प्राप्त

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या...
HomeKhedलोटेमध्ये विषारी वायूच्या गळतीने अस्वस्थ ग्रामस्थांची कंपनीवर धडक

लोटेमध्ये विषारी वायूच्या गळतीने अस्वस्थ ग्रामस्थांची कंपनीवर धडक

५० ते ६० ग्रामस्थांना श्वास घेण्यात त्रास होत आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमधून झालेल्या वायू गळतीचा त्रास होवू लागल्याने लोटे परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री औद्योगिक वसाहतीतील या कंपनीवर धडक दिली. दरम्यान दुषित वायूचा त्रास इतका वाढला की, श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने ५ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. त्यामध्ये दीड वर्षाची मुलगी आणि ७२ वर्षांचे आजोबांचा समावेश आहे. एकूण ५० ते ६० ग्रामस्थांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याने संतप्त ग्रामस्थ कंपनीवर त्वरित कारवाई करा या मागणीसाठी रात्री उशीरापर्यंत एक्सल कंपनीसमोर ठिय्या देवून होते.

ग्रामस्थांनी पत्रकारांना माहिती देतानां सांगितले की, मंगळवारी रात्री ९ वा. सुमारास परिसरातील अनेक ग्रामस्थांना अचानक श्वास घेण्यास त्रास होवू लागला. कोणत्यातरी विषारी वायुने हा त्रास होत असल्याचे चाळकेवाडी, तलारीवाडी आणि गोरेवाडीतील ग्रामस्थांना जाणवले. कंपनीतून वायूगळती झाल्यानेच हा त्रास होत आहे हे लक्षात येताच शेकडो ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी रात्री ९ वा. च्या सुमारास कंपनीच्या गेटवर धडक दिली. अनेकांना वायुचा त्रास होत होता. श्वास घेणे कठीण जात होते. त्यामुळे ग्रामस्थ संतापले होते. त्याही अवस्थेत कंपनीवर कारवाईची मागणी करण्यासाठी शेकडो ग्रामस्थ कंपनीच्या गेटवर धडकले होते.

यामधील ४ ते ५ जणांना तेथेच श्वास घेण्यास असह्य त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि त्यांना परशुराम रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती काही ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अनेकांना उलट्या आणि चक्कर येवू लागल्याने प्रथमोपचार करावे लागले. संतप्त ग्रामस्थ कंपनीसमोर ठिय्या देवून होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. कंपनीवर तातडीने कारवाई करा अशी त्यांची मागणी होती. दरम्यान याबाबत कंपनीची बाजू कळू शकली नाही. कंपनीने कोणतीही प्रतिक्रीया अधिकृतपणे दिलेली नाही. रात्री उशीरापर्यंत जमाव कंपनीसमोर ठाण मांडून होता. पोलीस संतप्त जमावाची समजूत काढत होते.

RELATED ARTICLES

Most Popular