25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeDapoliदापोली-खेडमध्ये दोन लाख ९१ हजार मतदार

दापोली-खेडमध्ये दोन लाख ९१ हजार मतदार

निवडणुकीत केवळ ९ उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रात एकच मतदान यंत्र असेल.

विधानसभा निवडणुकीत दापोली-खेड मतदार संघात एकूण २ लाख ९१ हजार २९७ मतदार असून त्यात १ लाख ३९ हजार ८९५ पुरुष आणि एक लाख ५१ हजार ४०२ महिला मतदार आहेत, तसेच सर्व्हिस वोटरची संख्या २०१ आहे. मतदार संघात ३९१ मतदान केंद्र आहेत. दापोलीत ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात माजी आमदार संजय कदम, आमदार योगेश कदम, ज्ञानदेव खांबे, संतोष अबगुल, अपक्ष संजय कदम, अपक्ष संजय कदम, प्रवीण मर्चेंडे, अपक्ष योगेश कदम व अपक्ष योगेश कदम असे उमेदवार आहेत. समान नावे असणारे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या नावाशी साधर्म्य सांगणारे अन्य दोन उमेदवार व माजी आमदार संजय कदम यांच्या नावाशी साधर्म्य सांगणारे अन्य दोन उमेदवार, असे एकूण तीन योगेश कदम व तीन संजय कदम या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. या निवडणुकीत केवळ ९ उमेदवार असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रात एकच मतदान यंत्र असेल.

१८ नोव्हेंबरपर्यंत ६ वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहात मतमोजणी होईल. या निवडणुकीत ३९१ मतदान केंद्रे आहेत तर १ लाख ३९ हजार ८९५ पुरुष व एक लाख ५१ हजार ४०२ स्त्रिया असे मिळून २ लाख ९१ हजार २९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत सर्व्हिस वोटरची संख्या २०१ असणार आहे. या निवडणुकीत ३० ऑगस्ट २०२४ पासून ६ हजार ४ मतदारांची संख्या वाढली आहे. या निवडणुकीकरिता १ हजार ७२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांवरील ३ हजार ५६० तर १ हजार ६०९ दिव्यांग मतदार आहेत. या निवडणुकीसाठी ४७० ईव्हीएम मशिन असतील.

नावसाधर्म्य उमेदवारांची करामत – या मतदार संघात दोन शिवनसेनेत प्रमुख लढत होणार असली तरीही मनसेकडून संतोष अबगुल आणि बसपाकडून रिंगणात असलेला उमेदवार महत्त्वाचा ठरणार आहे. मनसेचे संतोष अबगुल हे कुणबी समाजाची किती मते घेतात यावर विजयी गणित ठरणार आहे, तसेच नावसाधर्म्य असलेले उमेदवार काय करामत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नवमतदार पाच हजारांहून अधिक – गावागावात मतदान यंत्र पोचवण्यासाठी ५७ एसटीच्या गाड्या तर तीन मिनीबसची व्यवस्था केली आहे. या निवडणुकीत ९३० जणांनी गृह मतदानाचा पर्याय निवडलेला आहे. याकरिता ४२ पथकांची नियुक्ती केली आहे. या निवडणुकीत ५ हजार ६९७ नवमतदार प्रथमच निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा क्षेत्रात ५७. ३७ तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ६३.९३ टक्के मतदान झाले होते. या वेळी मतदानाचा मतदानाची आकडेवारी वाढवण्यावर भर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular