27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeEntertainmentमराठी कलाकार विराजस आणि शिवानीचे शुभमंगल सावधान

मराठी कलाकार विराजस आणि शिवानीचे शुभमंगल सावधान

आता त्यांच्या लग्नाचे विशेष फोटोही समोर आले असून या नवदांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मराठी सिनेसृष्टीत लाडकी जोडी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळ यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर या दोघांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. दोन दिवसांपूर्वी दोघांच्या घरी लग्नाची पूर्वतयारी सुरू होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता त्यांच्या लग्नाचे विशेष फोटोही समोर आले असून या नवदांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवानीने देखील तिचे मेहंदीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यासोबतच सासू मृणाल कुलकर्णी सोबत देखील तिने फोटो शूट केले होते.

झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस यानं गेल्या वर्षी पदार्पण केलं होतं. अल्पावधीतच विराजस घराघरात लोकप्रिय झाला. युवा पिढीचा खास करून तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. विराजस हा उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय उत्कृष्ठ लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. अनेक वर्षांपासून प्रायोगिक नाट्य क्षेत्रात विराजस कार्यरत आहे.

शिवानी देखील अभिनेत्री म्हणून काम करते. तिनं अनेक मालिकांमधून काम केलं आहे. स्टार प्रवाह वरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेमध्ये केलेली भुमिका तिची विशेष गाजली होती. शिवानीने आपल्या कसदार अभिनयाने विशेष परिश्रम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वांसमोर या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आज ते विवाह बंधनात अडकले आहेत.

मागील आठवड्यामध्ये दोघांनी किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या आगामी भागात विराजस आणि शिवानी किचनमध्ये एकत्र कल्ला करताना प्रेक्षकांना दिलसे होते. कार्यक्रमात पाककलेसह धमाल मजा मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

RELATED ARTICLES

Most Popular