30.4 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeChiplunपावसाळ्यापूर्वीच हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी होणार खुले

पावसाळ्यापूर्वीच हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी होणार खुले

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग आणि ठेकेदार कंपनीने हा पूल दि. १५ मे पूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी कंबर कसली आहे.

वाशिष्ठी नदीवर उभारलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणांतर्गतील दुसऱ्या पुलही १५ मे पर्यंत खुला करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर नवीन पूल वाहतुकीस सुरू झाल्यानंतर आधीच्या पुलावरील कॉंक्रिटीकरणातील बाहेर पडलेल्या लोखंडी सळ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

गतवर्षी २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन जुन्या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला होता. त्यामुळे धोकादायक बनलेल्या या मार्गावर काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या परिस्थितीमुळे चौपदरीकरणातील नवीन पुलाचे काम अतिशय घाईगडबडीत करण्यात आले होते. त्यासाठी २४ तास काम सुरू ठेवून व अतिरिक्त यंत्रणा कामाला लावून हे काम पूर्ण करण्यात आले.

पावसाळा तोंडावर असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील वाशिष्ठीच्या दुसर्‍या पुलाचेही काम मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग आणि ठेकेदार कंपनीने हा पूल दि. १५ मे पूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार या पुलाच्या कामाने गती घेतली आहे. दरम्यान पूल वाहतुकीस सुरू झाल्यानंतर आधीच्या पुलावरील कॉंक्रीटीकरण उडून लोखंडी सळ्या बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार दुसऱ्या पुलाचे काम वेगाने सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आले.

दुसऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे काम पूर्णत्वास गेले असून त्यावर आता केवळ डांबरीकरणाची प्रक्रिया शिल्लक राहिली असून तीला सुरवात करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसामध्ये हे काम पूर्ण करून १५ मे आधी कोणत्याही परिस्थितीत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असून  हा पूल खुला झाल्यानंतर आधीच्या पुलावर दुरुस्तीचे राहिलेले कामकाज केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular