28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023

मांडवी एक्स्प्रेस मध्ये सापडल्या घरातून पळालेल्या मुली

घरी जाण्यास उशीर झाल्याने पालक रागावतील या...

रत्नागिरीत शिमग्याच पोस्त आल अंगाशी !

५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या,...

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...
HomeLifestyleउन्हाळी सहलींचे वेध, घ्या विशेष हलकीफुलकी काळजी

उन्हाळी सहलींचे वेध, घ्या विशेष हलकीफुलकी काळजी

यंदा उन्हाचा कहर मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने अशा वेळी सहलीचा प्लान करताना कोणती विशेष काळजी घ्यावी यासाठी या लेखाची तजवीज.  

सध्या सर्वत्र उन्हाळी सुट्ट्यांचे वेध लागल्याने, कुटुंबासह, मित्र मैत्रिणीसोबत अनेक जण कुठे ना कुठे फिरण्याचे प्लान बनवत असतात. परंतु यंदा उन्हाचा कहर मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने अशा वेळी सहलीचा प्लान करताना कोणती विशेष काळजी घ्यावी यासाठी या लेखाची तजवीज.

उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडत असल्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जातात. कडक उन्हामुळे घाम, थकवा येणे अशा अनेक समस्या स्वाभाविकपणे उद्भवतात. यामुळे पुढील प्रवास करणे कठीण बनते. या उन्हाळ्यात सहलीला जाण्याचा विचार करत असाल आणि प्रवासा दरम्यान होणारा त्रास टाळायचा असेल तर बॅग पॅक करताना काही विशेष गोष्टी जरूर लक्षात ठेवा.

उन्हाळ्यात घामामुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे स्वतःचा वेगळा कॉटनचा टॉवेल, पंचा आणि ओले वाइप्स देखील सोबत बाळगा. वेळोवेळी त्वचा स्वच्छ करत राहा त्यामुळे बाहेरील संसर्गाचा धोका कमी होईल. उन्हापासून बचाव करण्यासाठी आपल्या बॅगमध्ये टोपी किंवा स्कार्फ ठेवणे या हंगामात अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, उन्हाळ्यात प्रवास करताना सनग्लासेसचा वापर करावा, जेणेकरून स्टायलिश तर दिसालच पण उन्हापासून डोळ्याचे संरक्षणही होईल.

उन्हाळ्यात घाम अधिक प्रमाणात येतो, पाण्याच्या बॉटल सोबत बाळगा. बॅगमध्ये कायम आवडत्या बॉडी परफ्यूम ठेवणे आणि गरजेच्या वेळेला वापर करणे आवश्यक आहे. उन्हामुळे त्वचा काळवंडते, हेच टॅनिंग टाळण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन वापरावे. सनस्क्रीन सूर्य प्रकाशापासून आपल्या त्वचेचे संरक्षण करते. चांगला एसपीएफ+ असलेले सनस्क्रीन लोशनचा वापर उन्हात जाण्याच्या दहा मिनिट आधी करावा.

प्रवासामध्ये जास्त ओझे होणार नाही असे कपडे आणि आवश्यक समान न्यावे. बॅग पॅकिंग करताना हलके व आरामदायक कपडे सोबत घ्यावे, तसेच प्रवासात सैल कपडे वापरावे. त्यामुळे घाम कमी येईल, शक्यतो सैल आणि सुती कपडे वापरावे.

RELATED ARTICLES

Most Popular