27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी...
HomeSindhudurgराजकोटवरील शिवपुतळ्याचे आज पूजन…

राजकोटवरील शिवपुतळ्याचे आज पूजन…

पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे.

मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. ११ मे रोजी दर्शन घेऊन पूजन करणार आहेत. हा कार्यक्रम. दुपारी १२. ३० वाजता होणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री, खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत. राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मे. राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनी कडून करण्यात आले आहे. या पुतळ्याचे काम राम सुतार यांचे सुपुत्र शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.

पुतळा उभारण्याचे काम ईपीसी तत्त्वावर झालेले आहे. समुद्राच्या दिशेने तलवारधारी स्थितीत आणि योद्ध्याच्या आवेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे. पुतळ्याची उंची ६० फुट असून जमिनी पासून उंची ९३ पुट एवढी आहे. संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आला असून पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे. तसेच चौथऱ्यासाठीच ५० या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. पुतळ्याचे या संकल्पन आयआयटी मुंबई या तज्ञ संस्थेकडून तपासून घेण्यात आलेले आहे. या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन होणार आहे.

या पूजन समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खासदार नारायण’ राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आम. निरंजन डावखरे, आम. ज्ञानेश्वर म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, सा. बां. विभाग (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, बांधकाम सचिव संजय दशपुते, सा. बां. कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे अभियंता मिलिंद कुलकर्णी, सावंतवाडी विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, मालवणं उपविभाग सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular