राजापूर शहर बाजारपेठेत रस्त्यालगत काही जुन्या इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यापूर्वी अनेकदा नगरपरिषद प्रशासनाने संबंधित इमारत मालकांना नोटीसा बजावून धोकादायक इमारती हटविण्यास सांगितल्या होत्या. मात्र अद्यापही शहर बाजारपेठेत काही जीर्ण इमारती केव्हाही कोसळण्याया स्थितीत आहेत. त्यामुळे अशा धोकादायक इम ारतींचा योग्य तो बंदोबस्त न केल्यास इमारत मालकांवर कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. राजापूर शहर हे ब्रिटीशकालीन बंदर म्हणून प्रसिध्द होते. आजही अनेक जुन्या इमारती राजापूर बाजारपेठेत आहेत. मात्र वर्षानुवर्षे अशा इमारतींमध्ये वास्तव्य नसल्याने काही इमारती जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
यापूर्वी शहर बाजारपेठेतील रस्त्यालगत असलेल्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना देखील घडलेली आहे. राजापूर बाजारपेठेत दाटीवाटीने दुकाने वसलेली आहे. त्यातच बाजारपेठेतील रस्त्यावर ग्राहकांसह शहरातील नागरीकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. अशावेळी या धोकादायक इमारतींमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वी धोकादायक इमारत कोसळण्याची घटना घडल्यानंतर नगरपरिषद पशासनाने अशा शहर ारत मालकांना इमारत कोसळून घेण्याबाबतची नोटीसा बजावल्या होत्या. तसेच धोकादायक इमारती स्वतहून उतरवून न घेतल्यास फौजदारी दाखल करण्याचा इशाराही नगरपरिषद प्रशासनाने दिला होता.
मात्र अद्यापही काही धोकादायक इमारती तशाच असून नगरपरिषद प्रशासन आता अशा धोकादायक इमारतींविरोधात -अॅक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे.यावर्षी पावसाळी हंगामामध्ये शहरातील धोकादायक इमारतींमुळे होणारी, संभाव्य जिवीत वा वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित मालकांनी धोकादायक इमारती तत्काळ हटवाव्यात. तसा धोकादायक झाडां देखील बंदोबस्त करावा, अन्यथा संबंधितांवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.