22.6 C
Ratnagiri
Saturday, February 28, 2026

समुद्रात सोडलेल्या डॉल्फिनचा अखेर मृत्यू

हर्णै समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका डॉल्फिनला...

दगाफटका करणाऱ्यांची गय नाही : मंत्री उदय सामंत

राज्याच्या तुलनेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उमेदवार शिवसेनेने विजयी...

पोमेंडीतील देवराईत हळद्या, तांबट, वनघुबडाचे सुखद दर्शन

वेळ सकाळी सात, साडेसात, स्थळ पोमेंडीची देवराई,...
HomeRatnagiriकाळी काच बसवणाऱ्या ३६ जणांना दंड - जिल्हा वाहतूक शाखा

काळी काच बसवणाऱ्या ३६ जणांना दंड – जिल्हा वाहतूक शाखा

१५०० रुपयांचा दंड आकारला जातो.

मोटारींच्या काचा पारदर्शी ठेवणे आवश्यक असतानाही नियम धाब्यावर बसवून काचांना काळी फिल्म बसवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यांत या शाखेकडून काचांना काळी फिल्म लावलेल्या ३६ वाहनधारकांवर कारवाई करून २१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. मोटारवाहन कायद्यानुसार, मोटारीच्या काचा या पारदर्शी असणे आवश्यक केले आहे. यापूर्वी ३० टक्क्यांपर्यंतचे फिल्मिंग करण्यास परवानगी होती ज्यातून आतील व्यक्ती आणि हालचाली बाहेर दिसणे आवश्यक होते; मात्र अनेक वाहनचालक या नियमाला हरताळ फासून गडद काळ्या काचा वाहनाला बसवतात.

अशा चारचाकी आढळल्यास मालकाला पहिल्यावेळी ५०० रुपयांचा दंड आणि दुसऱ्यावेळी गुन्हा केल्यास १ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला जातो. जिल्हा वाहतूक शाखेकडून चारचाकी वाहनांच्या खिडक्यांना गडद काळ्या काचा बसवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत या शाखेने ३६ वाहनांवर कारवाई करून २१ हजार रुपयांचा दंड केला. १५०० रुपयांचा दंड आकारला जातो. अशा वाहनांवर येथील जिल्हा वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

काच बसवण्याचा नियम – सुरक्षेच्यादृष्टीने वाहनांच्या खिडक्यांच्या काचा काळ्या न करता पारदर्शी असाव्यात. प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काचा ३० टक्क्यांपर्यंत काळ्या ठेवता येतात; मात्र आतील दिसणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular