मुंबई- अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेनच्या मार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. त्यांकरिता अरबी समुद्राखाली बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) याचा वापर केला जाणार आहे. ही पद्धत परदेशात वापरली जाते. आता भारतातही त्या पद्धतीच्या साह्याने बोगदा तयार केला जाणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचं काम सुरू आहे: नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पो रेशन या ५०८ किमी लांब मार्गाचं काम करते आहे. त्यापैकी २१ किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून असणार आहे. तो भाग समुद्राखालून असल्यानं समुद्राच्या खाली बोगदा तयार केला जात आहे.
हा बोगदा भारतातला समुद्राखालचा पहिलाच बोगदा असणार आहे. या बोगद्याची खोली जमिनीखाली २५ ते ६५ मीटर इतकी असेल. हा बोगदा करण्यासाठी तयार ३ राक्षसी वाटतील इतक्या मोठ्या मशीन्सचा वापर केला जाईल. घणसोली, शिळफाटा आणि विक्रोळी भागात त्या मशिनरीद्वारे काम सुरू करण्यासाठी खोदकाम केलं जातंय. या वर्षाअखेरीपर्यंत पहिल्या टनेल बोअरिंग मशीनद्वारै काम सुरू होणार असल्याचा अंदाज आहे
अनेक आव्हाने – जमिनीखालचा हा मार्ग तयार करण्यामध्ये अनेक आव्हानं आहेत. विशेषतः समुद्राच्या खाली असणाऱ्या ७ किलोमीटरचा बोगदा तयार करताना खूप अडचणी येऊ शकतात. समुद्र हे त्यातलं मोठं आव्हान असेल शिवाय अनेक तांत्रिक अडचणी त्यात असू शकतात. हा बोगदा सिंगल ट्यूब बोगदा असेल. त्यात बुलेट ट्रेनला येण्यासाठी व जाण्यासाठी असे दोन ट्रॅक असतील. समुद्राखालूनही ही बुलेट ट्रेन ताशी ३२० किलोमीटर याच
वेगानं धावेल.
२१ कि.मी.चा भुयारी मार्ग – बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा भुयारी मार्ग महाराष्ट्रातल्या वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सपासून ते शिळफाट्यापर्यंत बनवला जातो आहे. ठाणे क्रीक झोनमध्ये (इंटरटायडल झोन) समुद्राच्या खाली ७ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार केला जाईल. एकूण २१ किलोमीटरपैकी १६ किलोमीटरच्या मार्गाचं खोदकाम करण्यासाठी १३.१ मीटर व्यासाच्या कटर हेड लावलेल्या टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाईल. मेट्रोसाठीचा बोगदा तयार करण्यासाठी ५-६ मीटर व्यासाच्या कटर हेडचा वापर केला जातो. १६ किलोमीटरच्या मार्गात खोदकाम करण्यासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाणार आहे. उरलेल्या पाच किलोम ीटर मार्गाचं खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडनं केलं जाईल.
समुद्राखाली बोगदा – देशात पहिल्यांदाच समुद्राखाली बोगदा तयार केला जातो आहे. त्यामुळे त्याकरिता लागणारं टनेल बोअरिंग मशीन आपल्याकडे नाही. ‘विविध देशांकडून टीबीएमचे पार्ट्स मागवले जात आहेत. ते इथे असेंबल करून मग खोदकाम सुरू होईल.