28 C
Ratnagiri
Tuesday, June 10, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraशिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

किरण लोहार आपल्याला मिळालेल्या पुरस्कारापैकी काही पैसे मागत असल्याचा आरोप रणजित डिसले यांनी एका मुलाखतीत केला होता.

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयान यासंबंधित आदेश देत किरण लोहार यांना ३ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते. शिक्षण क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल रणजित डिसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला होता. तसेच त्यांना अमेरिकेची फुलब्राईट शिष्यवृत्तीही जाहीर झाली होती. किरण लोहार आपल्याला मिळालेल्या पुरस्कारापैकी काही पैसे मागत असल्याचा आरोप रणजित डिसले यांनी एका मुलाखतीत केला होता.

किरण लोहार हे सोलापूर आधी कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत होते. तिथेही त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्तच ठरली होती. काही राजकारणी मंडळींना हाताशी धरून किरण लोहार बेकायदेशीर काम करत होते असा त्यांच्यावर आरोप आहे. किरण लोहार यांची पीएचडी मुळात बोगस आहे असाही आरोप केला जातोय.

स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोमवारी ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहात ताब्यात घेतलं होतं.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे उपाधीक्षक संजीव पाटील माहिती दिली. ते म्हणाले की, शिक्षण संस्था संचालक असलेल्या एका तक्रारदाराने या संदर्भात आमच्याकडे तक्रार केली होती. आपल्या शाळेतील वर्गवाढीचा प्रस्ताव तक्रारदराने शिक्षण विभागाकडे पाठविला होता. यासाठी यु-डायस प्रणालीद्वारे वरिष्ठ कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यासाठी शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती.

लाचेची ही मागणी असल्याचे आमच्या पडताळणीमध्ये समोर आले होते. लाचेच्या या रकमेपैकी २५ हजार रुपये स्वीकारताना शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही रंगेहात ताब्यात घेतले आहे. यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी काही अपसंपदा जमा केली आहे का याची देखील चौकशी केली जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular