29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriपहिल्याच श्रावण सोमवारी स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन, हजारो भाविकांनी घेतले

पहिल्याच श्रावण सोमवारी स्वयंभू मार्लेश्वराचे दर्शन, हजारो भाविकांनी घेतले

या मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पड

हर हर महादेव… शिवशंभोचा गजर करत पहिल्याच श्रावण सोमवारी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील स्वयंभू श्री देव मार्लेश्वराचे हजारो भाविकांनी दर्शन ‘घेतले. यावेळी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच संगमेश्वर तालुक्यातील शिवमंदिरेही शिवभक्तांच्या गर्दीनी अक्षरश फुलून गेली होती या शिवमंदिरांमध्ये शिवनामाचा गजर घुमताना दिसून आला. संगमेश्वर तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये पहिल्या श्रावण सोमवारी शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

या मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी या कार्यकमांमध्ये सहभागी होत ‘हर हर महादेव’ चा गजर करत मंदिर परिसर शिवमय करून टाकला. परिसरात अगदी भक्तीमय वातावरण. झाले होते. तालुक्यातील मारळ येथील श्री क्षेत्र मार्लेश्वर, आंगवली येथील मार्लेश्वर मठ, कसबा येथील कर्णेश्वर, सप्तेश्वर, निवेबुद्रक येथील सिध्देश्वर पाटगाव येथील सांब, तळवडे येथील टिकलेश्वर धामापूरातील सोमेश्वर, बुरंबाडमधील आमनायेश्वर आदिंसह विविध शिवमंदिरांमध्ये जाऊन भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले

RELATED ARTICLES

Most Popular