27.9 C
Ratnagiri
Saturday, June 7, 2025

गुकेश – कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस – नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या विभागात अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची...

रत्नागिरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तरूणाला पकडले…

पांढरा समुद्र परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला...

उध्दव ठाकरेंचे मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत…

गेल्या दीड महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे...
HomeRatnagiriदीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

पोलिस दलातील वाहतूक पोलिस व शहर पोलिसांचा तीन ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता.

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करीत रत्नागिरीत दीड दिवसाच्या १२ हजार गणरायांना गणेशभक्तांनी निरोप दिला. शहरातील मांडवी-भाट्ये समुद्रकिनाऱ्यासह ग्रामीण भागातील नदीतील पाणवठ्यावर दीड दिवसांच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन झाले. दिवसभर पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गाड्याचा वापर करून शिस्तबद्ध पद्धतीने केला. समुद्र किनारी फुलांची उधळण करीत, ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यात ११ हजार ८०३ घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला, तर ५ सार्वजनिक , गणेशोत्सवाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.

जिल्ह्यात खेडमध्ये २, दापोली, लांजा व चिपळूण येथे एका सार्वजनिक गणरायांना निरोप देण्यात आला. रत्नागिरीत मांडवी व भाट्ये समुद्र किनाऱ्यांसह तालुक्यातील ग्रामीण भागामध्येही पोलिस यंत्रणेने विशेष दक्षता घेत बंदोबस्त ठेवला होता. पोलिस पाटलांकडून याबाबत विसर्जन मिरवणुकांची माहिती घेतली जात होती. शांततेत व सुरक्षितपणे गणरायांना निरोप देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू होते. रत्नागिरीत सायंकाळी वरुण राजाचे आगमन झाल्याने अनेकांनी स्वतःच्या वाहनांमधूनच विसर्जनस्थळी नेऊन गणरायांना निरोप दिला.

नदी किनारी- पाणवठ्यावर घरगुती समुद्रकिनाऱ्यावर गणपतीचे तर विसर्जन होणार, रस्त्यावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पोलिस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता. दीड दिवसांच्या मांडवी किनारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी पोलिस दलातील वाहतूक पोलिस व शहर पोलिसांचा तीन ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता. अचानक पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे गणेश भक्तांनी मोटार, रिक्षातून मूर्ती विसर्जनासाठी मांडवी किनाऱ्यावर आणल्या. मांडवी येथें तीनही ठिकाणी दुचाकीसाठी प्रवेश नाकारण्यात येत होता.

त्यामुळे मांडवीं किनारी दीड दिवसाच्या गणपतीला गर्दी कमी दिसत होती. गणेशभक्त आरती धुपारती करून मांडवी किनारी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्यांकडे गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी देत होते. येथील मांडवी चौपाटीकडे जाणाऱ्या चौकातच बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, रत्नागिरी पालिकेने निर्माल्य संकलनासाठी मांडवी येथे तसेच पालिकेकडून गणेशमूर्ती संकलनासाठी एक गाडीही ठेवण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular