23.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriजिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा भातशेतीचे नुकसान

जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा भातशेतीचे नुकसान

भातशेतीची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. 

ऐन दिवाळीत रत्नागिरीच्या ग्रामीण भागासह चिपळूण आणि खेडला अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर आंबा उत्पादक देखील धास्तावले आहेत. जिल्ह्यात गेल्या ४ दिवसांपासून पाऊस कोसळतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडला. या अवकाळी पावसाने दिवाळी खरेदीलाही फटका बसला. चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. मेघगर्जनेसह वीजाही चमकत होत्या.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतात कापून ठेवलेल्या भातपिकाचे तसेच उडव्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चिपळुणात आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. खेडमध्येदेखील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्याचा परिणाम बाजारपेठेतील दिवाळी खरेदीवर झाला. ग्रामीण भागात भातशेती कापणीची लगबग सुरू असताना तालुक्यात अवकाळी पावसाने धूमाकूळ घातला आहे. आंबवली या बंदरपट्ट्यात सलग ३ दिवस दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळत आहे. भातशेतीची कापणी सुरू असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे.

कापून ठेवलेले भात भिजले आहे. आंबवली, वरवली, सणघर, नांदिवली, वडगांव आदी भागात पावसाने भातशेतीचे नुकसान केले असल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली आहे. गणपतीनंतर मंदावलेली खेडची बाजारपेठ दिवाळी खरेदीमुळे उजळली होती. मात्र पावसाने जोरदार सुरुवात केल्याने खरेदीसाठी आलेल्या. नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने बाजारातील खरेदीवर परिणाम झाला तर दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

दापोली, मंडणगडमध्येही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दापोली शहरात कोसळलेल्या पावसाने पर्यटकांची तारांबळ उडाली. तर ग्रामीण भागात भातशेतीचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा आंबा पिकावर तर परिणाम होणार नाही ना, या भीतीने आंबा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. आंब्याचा हंगाम आता कुठे सुरु होतो आहे. तोच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे. दिवाळीच्या आनंदावरही कुठेतरी विरजण पडताना दिसले.

RELATED ARTICLES

Most Popular