29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiri४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले तरी पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता राहील, अशी माहिती पुणे वेधशाळेचे अधिकारी डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. तर. ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो, असे देखील वेधशाळेकडून सांगण्यात आले. दरम्यान, केरळमध्ये मान्सून ऑनसेट झाल्यावरच सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील पावसाची स्थिती अवलंबून असेल, असे सांगण्यात आले. हवामानाचा अचूक अंदाज बांधणं हे जोखमीचे समजले जाते. पण, तरीही राज्यातील वेधशाळा हा अंदाज बरोबर लावताना दिसते. वेधशाळेतून हवामानाचा अंदाज लावण्यासाठी दर ३ तासांनी हवेच्या दिशेच्या आकडेवारीचा डेटा दिला जात असतो.

हवेचा दाब, आर्द्रता, पर्जन्य, वाऱ्याचा वेग यांचा अभ्यास करून अशी बरीच हवामान निरीक्षणे याद्वारे वेधशाळा नोंदवत असते. वेधशाळा ‘रडार’ या उपकरणाद्वारे पाऊस पडण्याच्या बरोबर तीन तास आधी पाऊस कोणत्या भागात पडणार हा हवामानाचा अचूक अंदाज दर्शवत असते. हवामान विभागाकडे विविध प्रदेशांमंधून येणाऱ्या माहितीमध्ये सांख्यिकी माहिती असते. या माहितीला वेगवेगळ्या मंडिल्सच्या अंतर्गत विभागले जाते. सतत बदलणाऱ्या हवामानाच्या स्थितीची गणितीय समीकरणे इतकी गुंतागुंतीचे असतात की त्याला सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने चालवले जाते. पावसाचे पूर्व अनुमान करण्यासाठी मुख्यतः सांख्यिकी पद्धतीचा वापर केला जातो.

पावसाचा निसर्ग अंदाज जुन्या जाणत्यांच्या तोंडून ! – कडक उन्हाळ्याने जमीन तापू लागल्यानंतर सर्व सृष्टीला ओढ लागते ती मान्सूनची. पावसाला सुरुवात झाली की सृष्टीतील सर्वांच्या नवनिर्मितीच्या उर्मी उभारून येतात. आज हवाम ानशास्त्र बरेच प्रगत झाले तरी, काही जुनी जाणती माणसे अजूनही आपल्या ठोकताळ्यांद्वारे पावसाचा अंदाज लावत असतात. आपल्या पारंपरिक ज्ञानावर आधारित ते हा अंदाज बांधतात. पाऊस कमी किंवा जास्त लागणार, याचे ठोकताळे ही जुनीजाणती माणसे बांधतात. झाड, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या वर्तनातून पावसाचे ठोकताळे ‘आजही लावले जातात. सर्वात आधी ऋतुचक्र हे नियमित होते. परंतु गेल्या काही वर्षात हे ऋतुचक्र बिघडलेले पाहायला मिळते. कावळ्याने मे म हिन्याच्या दिवसात बाभूळ या काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि जर आंब्याच्या झाडावर कावळ्याने घरंटे बांधले तर पाऊस त्यावर्षी जास्त येतो, असे देवसू येथील लक्ष्मण गावडे यांनी निसर्ग ठोकताळ्यावरून सांगितले.

कावळ्याची अंडी अन् पाऊस – कावळ्यांनी मे महिन्याच्या कालावधीत किती अंडी घातली यावरूनही पावसाचा अंदाज बांधला जात असे. जर कावळ्यांनी तीन ते चार अंडी दिली तर पाऊस जास्त पडतो आणि एकच अंडे दिले तर कमी असेही मानले जाते. पाऊस येण्याआधी पक्षी समुद्रकिनाऱ्यावर येऊ लागतात तेव्हा पाऊस येणार हे ओळखायचे. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत समुद्रकिनाऱ्यावर उपजीविका असलेले मच्छीमार बांधत असतात. हा संकेत मिळाला की मच्छीमार आपल्या होड्या समुद्रात नेत नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular