22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunगुहागर-चिपळूण-खेडबाबत अजून निर्णय नाही - डॉ. नातू

गुहागर-चिपळूण-खेडबाबत अजून निर्णय नाही – डॉ. नातू

जागावाटप आणि उमेदवारीवरून गुहागर मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, अजित दादा पवार तसेच महायुतीचे अन्य घटक पक्षाचे नेते एकत्र बसून महाराष्ट्रातील जागा वाटपाचा निर्णय घेतील. त्यामुळे गुहागर- चिपळूण-खेड मतदारसंघाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना त्या विषयावर बोलणे योग्य ठरणार नाही अशा स्पष्ट शब्दात माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जागावाटप आणि उमेदवारीवरून गुहागर मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे या मतदारसंघातून इच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परंतु शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. तर मग रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विपुल कदम यांना उमेदवारी देण्याचा कोणताच निर्णय झालेला नाही असे स्पष्ट करतानाच गुहागर मतदारसंघातून शिवसैनिकला उमेदवारी दिली जाईल असेही स्पष्ट केले होते.

भाजपकडून नातू इच्छूक – गुहागर मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनय नातू भाजपकडून इच्छुक असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे या संदर्भात थेट डॉ. विनय नातू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राज्यात महायुती आहे आणि एकनाथ शिंदे, देवेन्द्र फडणवीस व अजित दादा पवार हे महायुतीचे नेते आहेत. तसेच महायुतीत अन्य घटक पक्षदेखील आहेत. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय एकत्र बसून नेते मंडळी घेणार आहेत. २८८ जागांचा निर्णय होणार आहे. त्यामध्ये गुहागर- चिपळूण-खेड मतदारसंघदेखील असणारच आहे असेही डॉ. नातू म्हणाले.

आमचा विश्वास आहे – पालकमंत्री उदय सामंत हे शिवसेनेचे नेते आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महायुतीच्या समन्वय समितीत देखील ते आहेत. भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे देखील समन्वय समितीत आहेत. त्यामुळे ते महायुतीत योग्य समन्वय साधतील यावर आमचा विश्वास आहे. अद्याप जागावाटपावर कोणताच निर्णय झालेला नसताना त्यासंदर्भात बोलणे उचित होणार नाही अशी स्पष्ट प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular